Paytm Share Price | बाब्बो पेटीएम शेअरवर ढगफुटी! शेअर्स 11 टक्के कोसळले, थोडे वाढतात अन जास्त पडतात, कारण जाणून घ्या

Paytm Share Price | One 97 Communications या डिजिटल वॉलेट पेटीएम ॲप चालवणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कमालीची पडझड पाहायला मिळाली होती. NSE इंडेक्सवर Paytm कंपनीच्या शेअरमध्ये 11.51 टक्क्यांची मजबूत पडझड पाहायला मिळाली होती. या कंपनीच्या शेअरने इंट्राडे ट्रेडिंग सेशनमध्ये 474.30 रुपये ही आपली सर्वकालीन नीचांक किंमत पातळी स्पर्श केली होती. Jio Financial Service’s ने आपली वॉलेट सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे, त्यामुळे पेटीएम कंपनीच्या स्टॉकमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणत घसरण सुरू झाली आहे. शेअर बाजारातील अनेक विश्लेषकांचे मत असे आहे की, Jio Financial Service’s ने जर आपली सुरू केली तर पेटीएम कंपनीच्या व्यवसायाला खूप मोठा नुकसान सहन करावा लागेल.
10 टक्के घसरण :
पेटीएम कंपनीच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांची घसरण झाली असून स्टॉक बीएसईवर 476.65 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहे. मागील एका आठवड्यात हा स्टॉक 23 टक्के कमजोर झाला आहे. पेटीएमचे शेअर्स सुरुवातीपासूनच गुंतवणूकदारांसाठी त्रासदायक ठरले आहेत. शेअरची दिवसेंदिवस पडत असल्याने या कंपनीची नफा मिळण्याची आशाही धुळीस मिळत आहे. हा स्टॉक थोडा वाढतो, आणि जास्त पडतो.
संस्थात्मक गुंतवणूकदारांची विक्री :
ब्रोक्ररेज फर्मच्या अहवालानुसार संस्थात्मक गुंतवणूकदारांनी Paytm स्टॉक मध्ये मोठ्या प्रमाणात विक्री केली होती. या विक्रीमुळे पेटीएम शेअरवर इतका दबाव आला की स्टॉक कोसळला. SVF India Holdings ने Paytm कंपनीचे 2.93 कोटी शेअर्स सरासरी 555.67 रुपये या किमतीवर विकून टाकले. त्याची एकूण किंमत 1,630.89 कोटी रुपये होती. SVF कडे सप्टेंबर 2022 पर्यंत पेटीएम कंपनीचे 11.32 कोटी शेअर्स होते, पेड अप कॅपिटलमधील त्याचे एकूण प्रमाण 17.45 टक्के होते.
विश्लेषकांकडून सावधानतेचा इशारा :
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसमुळे पेटीएम कंपनीचे खूप मोठे नुकसान होणार आहे, असा इशारा तज्ञांनी दिला आहे. जिओ रिलायन्स इंडस्ट्रीजने नुकताच आपला आर्थिक सेवा व्यवसाय जीप पासून वेगळा असून त्याचे नाव बदलून Jio Financial Services ठेवले आहे. मॅक्वेरी कॅपिटल सिक्युरिटीज फर्मच्या विश्लेषकानी माहिती दिली आहे की, एचडीएफसी ट्विन्स, एसबीआय, आयसीआयसीआय बँक आणि अॅक्सिस बँकेनंतर Jio Financial Services ही भारतातील पाचवी सर्वात मोठी वित्तीय सेवा कंपनी म्हणून ओळखली जाईल.
मॅक्वेरी कॅपिटल सिक्युरिटीज फर्मचे तज्ञ म्हणाले की, जिओ कोणत्या ग्राहक विभागांना टारगेट करेल आणि आपले सेवा देईल हे सध्या अस्पष्ट आहे. तथापि, एक गोष्ट स्पष्ट दिसून येते की JFS चे लक्ष सामान्य ग्राहक आणि व्यापारी कर्ज या दोन्ही सेवा प्रदान करण्यावर असेल. सामान्य ग्राहक सेवा आणि व्यापारी कर्ज सेवा हे दोन्ही बजाज फायनान्स आणि पेटीएम सारख्या NBFC फिनटेक कंपन्यांचे मुख्य व्यापारी आधार मानले जातात.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Paytm Share price has fallen down after announcing Jio financial services has launched in market on 23 November 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Maiden Forgings IPO | या आठवड्यात हा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार, गुंतवणुकीसाठी पैसे तयार ठेवा, मजबूत फायदा होईल
-
Hemang Resources Share Price | कमाईची संधी! 164 टक्के परतावा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, स्टॉक डिटेल्स पहा
-
Quality Foils India IPO | या आयपीओला मिळाला उदंड प्रतिसाद, स्टॉकची लिस्टिंग जबरदस्त होणार, आयपीओ GMP किती?
-
Sprayking Agro Equipment Share Price | लोकांना करोडपती बनवणाऱ्या कंपनीने फ्री बोनस शेअर्सची घोषणा केली, रेकॉर्ड डेट पहा, फायदा घ्या
-
Aditya Vision Share Price | अबब! नशीब बदलणारा शेअर, 3 वर्षांत गुंतवणूकदारांना 8000 टक्के परतावा दिला, स्टॉक आजही तेजीत
-
Suryalata Spinning Mills Share Price | 25 दिवसात 100% परतावा! हा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, स्टॉक खरेदी करणार का?
-
Multibagger Stocks | होय! हेच ते 10 मल्टिबॅगर शेअर्स! फक्त 1 महिन्यात 164 टक्क्यांपर्यंत परतावा देऊन श्रीमंत करत आहेत
-
Achyut Healthcare Share Price | गुंतवणुकदारांना मालामाल करणारी कंपनी फ्री शेअर्स वाटप करणार, रेकॉर्ड डेट आधी खरेदी करा
-
Global Capital Markets Share Price | 1 वर्षात 482% परतावा देणाऱ्या शेअरवर फ्री बोनस शेअर्स मिळत आहेत, संधीचा फायदा घ्या
-
Kama Holdings Share Price | या शेअरवर 840 टक्के डिव्हीडंड मिळणार, फायदा घेण्यासाठी रेकॉर्ड डेट माहिती आहे का?