
Paytm Share Price | पेटीएमची मूळ कंपनी असलेल्या वन 97 कम्युनिकेशन्स कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 2.5 टक्क्यांच्या वाढीसह 975 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2023 या वर्षात पेटीएम स्टॉकची किंमत 86 टक्क्यांनी वाढली आहे. मागील 11 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 124 टक्के परतावा कमावून दिला आहे.
या कंपनीच्या शेअरची कामगिरी पाहून ब्रोकरेज हाऊसेने स्टॉकवर सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी पेटीएम स्टॉक 1.20 टक्के वाढीसह 980.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
ग्लोबल ब्रोकरेज हाऊस जेफरीज फर्मने पेटीएम कंपनीच्या शेअरवर 1300 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत आणखी 36 ते 37 टक्के वाढू शकतो. जेफरीज फर्मच्या मते, कंपनीच्या क्रेडिटमध्ये सतत वाढ होत आहे, आणि पेमेंटमधील मार्जिन विस्तारामुळे, कंपनी पुढील काळात मजबूत नफा कमवू शकते.
पुढील 4 तिमाहीत पेटीएम कंपनीचे शेअर्स फायदेशीर फिनटेक कंपनीच्या जागतिण्याक यादीत सामील होऊ शकतात. तज्ञांच्या मते पेटीएम फिनटेक कंपनी पुढील 4 तिमाहीत नफ्यात येऊ शकते. सध्या या कंपनीचे शेअर्स सवलतीत उपलब्ध आहेत. ब्रोकरेज हाऊस Goldman Sachs पेटीएम कंपनीच्या स्टॉकवर 1250 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे.
पेटीएम कंपनीने 20 ऑक्टोबर 2023 रोजी आपले आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. तिमाही आधारावर कंपनीच्या महसुलात मजबूत वाढ पाहायला मिळाली आहे. कंपनीच्या कर्ज वितरणात सातत्याने वाढ झाल्याने कंपनीचा महसुल अधिक वाढला आहे. जून 2026 तिमाहीत पेटीएम कंपनीचा तोटा कमी होऊन 358.4 कोटी रुपयेवर आला होता. तर आर्थिक वर्ष 2023 च्या जून तिमाहीत पेटीएम कंपनीला 645.4 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता.
पेटीएम कंपनीचे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार पेटीएम ही फिनटेक कंपनी 2023-24 या वर्षाच्या अखेरीस पॉझिटिव्ह फ्री कॅश फ्लो स्थितीपर्यंत पोहोचेल. पॉझिटिव्ह फ्री कॅश फ्लो म्हणजे व्यवसायामध्ये वाढीसाठी गुंतवणूक करण्यायोग्य रक्कम.
पेटीएम कंपनीचे शेअर्स IPO इश्यू किमतीच्या तुलनेत 56 टक्के खालच्या किमतीवर ट्रेड करत आहेत. पेटीएम कंपनीचा IPO 2021 मध्ये आला होता. मात्र स्टॉकने आपल्या दीर्घकाळ गुंतवणूकदारांना फारसा विशेष परतावा कमावून दिलेला नाहीये.
पेटीएम कंपनीचे शेअर्स सध्या 950 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ही किंमत 2150 रुपये या IPO इश्यू किंमतीच्या तुलनेत 56 टक्के कमी आहे. पेटीएम कंपनीचे शेअर्स 18 नोव्हेंबर 2021 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले होते. पेटीएम कंपनीचे शेअर्स 2150 रुपये इश्यू किमतीच्या तुलनेत 1955 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.