 
						Paytm Share Price | पेटीएमची मूळ कंपनी असलेल्या वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. पेटीएम स्टॉक आपल्या उच्चांक किंमत पातळीवरून खाली घसरत आहे. सतत येणाऱ्या नकारात्मक बातम्या पेटीएम स्टॉकला आणखी खोलात घेऊन जात आहेत. ऑक्टोबर 2023 मध्ये पेटीएम स्टॉक 1000 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मात्र त्यानंतर हा स्टॉक विक्रीच्या गर्तेत अडकला आणि शेअर तेव्हापासून सतत घसरत आहे.
मागील 3 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत हा स्टॉक 592.25 रुपये किमतीवर आला होता. आपल्या उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत पेटीएम स्टॉक तब्बल 45 टक्के कमजोर झाला आहे. नुकताच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कठोर नियमांमुळे, पेटीएम कंपनीने वैयक्तिक कर्ज वाटपात कपात करण्याची घोषणा केली. आणि शेअरमध्ये जणू उतरती कळा लागली. आज शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी पेटीएम स्टॉक 0.63 टक्के वाढीसह 642.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
अमेरिकेतील प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी पेटीएम कंपनीतून काढता पाय घेतला आहे. वॉरेन बफे यांना पेटीएम स्टॉकमुळे जवळपास 600 कोटी रुपयेचा तोटा सहन करावा लागला आहे. 7 डिसेंबर 2023 रोजी, पेटीएम स्टॉक 20 टक्के घसरणीसह क्लोज झाला होता. तर 13 डिसेंबर 2023 रोजी शेअरची किंमत 592.25 रुपये किमतीवर पोहचली होती. जर तुम्ही पेटीएम स्टॉकचा दैनिक चार्ट पाहिला तर तुम्हाला समजेल की, पेटीएम स्टॉकमध्ये खालच्या स्तरावर सपोर्ट तयार होत आहे.
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजार ज्या तीव्रतेने पडला, त्यातुलनेत पेटीएम स्टॉकमध्ये कमी घसरण पहायला मिळाली होती. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात किंचित दबाव आला, आणि पेटीएम स्टॉक किंचित घसरणीसह 610 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर या स्टॉकमध्ये पुढील काही दिवस एकत्रीकरण चालू राहिले तर कदाचित पेटीएम स्टॉक वरच्या दिशेने ब्रेकआउट देऊ शकतो.
सध्या पेटीएम स्टॉक 642 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. पुढील काळात हा स्टॉक 650 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. मात्र तज्ञांनी गुंतवणूक करताना 592 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पेटीएम स्टॉक 615 रुपये किमतीवर क्लोज झाला होता, जर हा स्टॉक याच तेजीत स्थिर राहिला तर काही दिवसात शेअरची किंमत 680 रुपयांपर्यंत जाऊ शकते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		