 
						Paytm Share Price | पेटीएम कंपनीचे शेअर्स मागील एका महिन्यापासून मजबूत कामगिरी करत आहेत. त्यामुळे जुलै 2023 या महिन्यात पेटीएम कंपनीच्या शेअरने शानदार कामगिरी केली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमधे पेटीएम कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते.
जुलै महिन्यात कंपनीच्या मासिक वापरकर्त्यांचा नवीन अहवाल जाहीर झाला होता, त्यानंतर स्टॉकमध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी पेटीएम कंपनीचे शेअर्स 3.60 टक्के वाढीसह 795.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
सेबीला दिलेल्या माहितीत कंपनीने कळवले आहे की, जुलै 2023 महिन्यात मासिक वापरकर्त्याच्या संख्येत 19 टक्क्यांची वाढ झाली असून वापरकर्त्यांची संख्या 93 दशलक्षवर पोहोचली आहे. पेटीएम कंपनीने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या एकूण कर्ज व्यवसायात स्थिर वाढ नोंदवली गेली आहे. तर जुलै महिन्यात मागील वर्षीच्या तुलनेत 46 टक्के वाढीसह एकूण 43 लाख लोकांना कर्ज वाटप करण्यात आले आहे. यासह कंपनीकडे सोबत सध्या 9 कर्ज देणारे वित्तीय भागीदार संस्था काम करत आहेत.
2023-24 या आर्थिक वर्षात पेटीएम कंपनी आणखी 3 ते 4 कर्ज वाटप करणारे भागीदार जोडण्याचा प्रयत्न करत आहे. मागील 6 महिन्यांत पेटीएम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 42 टक्के नफा कमवून दिला आहे. तर महिला एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 6.83 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. मागील पाच ट्रेडिंग सेशनमधे पेटीएम कंपनीच्या शेअरने लोकांना 2.79 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		