 
						Paytm Share Price| पेटीएम कंपनीची मालकी असलेल्या One 97 Communications कंपनीचे संस्थापक आणि CEO विजय शेखर शर्मा लवकरच अँटफिन (नेदरलँड्स) होल्डिंग बी.व्ही कंपनीच्या मालकीचे 10.30 टक्के भाग भांडवल संपादन करणार आहेत. या करारानुसार विजय शेखर शर्मा यांनी अॅन्टफिन कंपनीकडून पेटीएम कंपनीचे 10.3 टक्के भाग भांडवल त्याच्या 100 टक्के मालकीच्या रेझिलिएंट अॅसेट मॅनेजमेंट BV मार्फत खरेदी करण्याची योजना आखली आहे. यानंतर अँटफिन (नेदरलँड्स) होल्डिंग बी.व्ही ही पेटीएम कंपनीमधील सर्वात मोठी शेअर धारक राहणार नाही. आज बुधवार दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी पेटीएम कंपनीचे शेअर्स 1.01 टक्के वाढीसह 839.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मात्र विजय शेखर शर्मा आणि अँटफिन (नेदरलँड्स) होल्डिंग बी.व्ही यांच्यातील ही डील पेटीएम कंपनीच्या फंडामेंटल्ससाठी खूप सकारात्मक बाब मानली जात आहे. या डीलची पूर्तता होताच विजय शेखर शर्मा यांचा पेटीएम कंपनीमधील वाटा 19.42 टक्के पर्यंत वाढणार आहे. यासह विजय शेखर शर्मा पेटीएम कंपनीतील सर्वात मोठे शेअरहोल्डर बनतील.
चीनच्या अँट ग्रुप कंपनीची उपकंपनी असलेल्या अँटफिनचा वाटा 13.5 टक्के पर्यंत कमी होणार आहे. BofA सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते कोणताही चीनी शेअर धारक पेटीएम कंपनीचा सर्वात मोठा भागधारक माही, ही देखील कंपनीसाठी सकारात्मक बाब असेल.
BofA ने Paytm कंपनीच्या स्टॉकवर प्रति शेअर 1,020 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. पेटीएम कंपनीचा आयपीओ 2150 रुपये किमतीवर ओपन झाला होता. आणि सध्या हा स्टॉक आपल्या IPO किमतीच्या 61 टक्के खाली आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 19.01 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 57.89 टक्के नफा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		