
PC Jeweller Share Price Today | एकीकडे सोने आणि चांदीच्या किमतीत प्रचंड वाढ होत आहे, तर दुसरीकडे ‘पीसी ज्वेलर्स’ कंपनीचे शेअर्स जमिनीवर आपटत आहेत. मागील सहा महिन्यांत ‘पीसी ज्वेलर्स’ कंपनीचे शेअर्स 75 टक्क्यांनी गडगडले आहेत. 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीशी तुलना केली तर तुम्हाला समजेल की, या कंपनीचे शेअर्स 125.50 रुपयांवरून 25.50 रुपयांवर आले आहेत. शुक्रवार दिनांक 28 एप्रिल 2023 रोजी ‘पीसी ज्वेलर्स’ कंपनीचे शेअर्स 0.79 टक्के घसरणीसह 25.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (PC Jeweller Limited)
गुंतवणुकदार कंगाल झाले :
मार्च 2023 तिमाहीपर्यंत ‘पीसी ज्वेलर्स’ कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 54.33 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. तर परकीय गुंतवणूकदारांनी कंपनीचे 1.65 टक्के आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांनी 1.45 टक्के आणि इतर गुंतवणूकदारांनी 42.37 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या स्टॉकची किंमत 70 टक्के कमजोर झाली आहे.
ज्या गुंतवणूकदारांनी या स्टॉकवर 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 30,000 रुपये राहिले आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 105.50 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 18.90 रुपये होती. मागील सहा महिन्यांत या ‘पीसी ज्वेलर्स’ कंपनीच्या शेअरची अवस्था फार बिकट झाली आहे.
स्टॉकबाबत तज्ञांचे मत :
शेअर बाजारातील तज्ज्ञ मध्यम ते कमी ट्रेंडलाइन मोमेंटम स्कोअरसह ‘पीसी ज्वेलर्स’ कंपनीचे शेअर्स खरेदी करताना जोखीम न घेण्याचा सल्ला देत आहेत. मागील 2 वर्षांत ROCE, ROE आणि ROA मध्ये कमालीची घट पाहायला मिळाली आहे. याशिवाय घसरत्या नफ्याच्या मार्जिनसह कंपनीच्या निव्वळ नफ्यात जबरदस्त घट पाहायला मिळाली आहे.
PC ज्वेलर ही कमजोर आर्थिक स्थिती असलेली कंपनी आहे. कंपनीच्या नेट कॅश फ्लोमध्ये सातत्याने घसरण होत आहे. मागील 2 वर्षांपासून कंपनीच्या वार्षिक निव्वळ नफ्यात घसरण झाल्याने शेअरचे पुस्तकी मूल्य कमजोर झाले आहे. या कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून खूप खाली आले आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.