
Penny Stock | सध्या भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी शेअर बाजारात जबरदस्त पडझड झाली होती. तर आज देखील बाजारात चढ उतार पाहायला मिळत आहे. या अस्थिरतेच्या काळात शेअर बाजारात असे अनेक पेनी स्टॉक आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना अप्रतिम नफा कमावून दिला आहे. आज लेखात आपण, नवोदय एंटरप्रायझेस कंपनीच्या पेनी स्टॉकबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. (Navoday Enterprises Share Price)
मागील आठवड्याच्या शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नवोदय एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 8.82 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 25 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 8.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
स्टॉकमधील उसळीचे कारण :
नवोदय एंटरप्रायझेस कनोजीच्या संचालक मंडळाची बैठक शनिवार दिनांक 22 जुलै 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती. संचालक मंडळाच्या बैठकीपूर्वी कंपनीच्या गुंतवणूकदारांनी नवोदय एंटरप्रायझेस कंपनी शेअर्समध्ये जोरदार खरेदी केली होती. संचालक मंडळाचा बैठकीत गुंतवणुकदारांना मोफत बोनस इक्विटी शेअर्स वाटप करण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली. याशिवाय संचालकांनी शेअर्सच्या योग्य मूल्यांकनाची जबाबदारी एमडी आणि सीएफओकडे सुपूर्द केली आहे.
नवोदय एंटरप्रायझेस कंपनीच्या स्टॉकने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 134.78 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एक वर्षभरात YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 69.10 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 33.00 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 35.23 टक्के वाढली आहे. ऑगस्ट 2022 मध्ये या कंपनीचे शेअर्स 3 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.