27 November 2022 5:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OnePlus 11 5G Smartphone | लाँचिंगपूर्वी वनप्लस 11 स्मार्टफोनची माहिती लीक, फीचर्स आणि किंमत पहा Google Messages | गुगल शॉर्ट्सने इन्स्ट्राग्रामचा बँड वाजवल्यानंतर व्हॉट्सॲपचा बँड वाजवणार गुगल मेसेजेस? Bhediya Day Box Office | भेडिया सिनेमाची धमाकेदार कमाई, प्रेक्षकांच्या प्रतिसादाने कलेक्शन जोमात Business Idea | 1 लाख मासिक उत्पन्नासाठी सुरू करा हा व्यवसाय, सरकारकडून 35 टक्के अनुदान देईल, प्रोजेक्ट डिटेल्स Airtel Jio 5G | देशातील कोणत्या शहरांमध्ये उपलब्ध आहे 5G सेवा, पाहा संपूर्ण यादी, तुमचं शहर आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर शिंदेचं दुर्लक्ष, पण कंटेनर भरून खोके दिले अशा वायफळ प्रतिक्रियांसाठी प्रचंड वेळ? Drishyam 2 Box Office | अजय देवगनच्या सिनेमाने मोडले अनेक रेकॉर्ड्स, शनिवारी मोठी कमाई, किती कलेक्शन?
x

Penny Stock | 2 रुपये बहुत बडी चीज होते है बाबू! या 2 रुपयाच्या पेनी शेअरने करोडपती बनवलं, स्टॉक नेम माहिती आहे का?

Penny Stock

Penny Stock| भारतातील सर्वात जुन्या आणि प्रसिद्ध म्युझिक कंपनीचे शेअर्स यावर्षी मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या स्टॉकच्या यादीत सामील झाले आहे. काही वर्षापूर्वी हा स्टॉक 2.22 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, तो आता 550.59 रुपयेवर पोहचला आहे. गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून देणाऱ्या सारेगामा इंडिया कंपनीच्या स्टॉकमध्ये आता काही काळापासून पडझड पाहायला मिळत आहे. या वर्षी आतापर्यंत स्टॉक 30 टक्क्यांहून जास्त पडलाबहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये NSE निर्देशांकावर सारेगामा कंपनीचे शेअर्स 372.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

सारेगामा इंडिया कंपनीची मालकी सध्या आरपी संजीव गोएंका ग्रुप ऑफ कंपनीज यांच्याकडे आहे. ही कंपनी नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज निर्देशांकावर ट्रेड करत आहे. कंपनीचे मुख्यालय कोलकाता येथे कार्यरत आहे. ही कंपनी पूर्वी द ग्रामोफोन कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणून ओळखली जात होती, पण नंतर तिचे नाव बदलून सारेगामा करण्यात आले. सध्या कंपनीचे बाजार भांडवल 7,17,829.73 लाख आहे. 1 जानेवारी 1999 रोजी सारेगामा कंपनीचे शेअर्स फक्त 2.22 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 25 फेब्रुवारी 2000 रोजी या स्टॉकने 200 रुपयांची किंमत पहिल्यांदा स्पर्श केली होती. नंतर तो पुन्हा 6 रुपयांपर्यंत पडला. हा स्टॉक 20 मार्च 2020 पासून तेजीत आला आणि 2 वर्षांत 3 जानेवारी 2022 रोजी स्टॉकने 550.59 रुपये ही आपली सर्वकालीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. सध्या हा शेअर 346.30 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीपर्यंत पडला आहे.

1 लाख रुपयांवर दिला 16 कोटी 68 लाख परतावा :
जर आपण या कंपनीच्या शेअरची परताव्याची आकडेवारी पाहिली तर तुम्हाला समजेल की या सारेगामा इंडिया कंपनीच्या स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. ज्या लोकांनी 23 वर्षांपूर्वी या कंपनीच्या स्टॉकमध्ये 2.22 रुपये या दराने एक लाख रुपये लावले होते, आता त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 16 कोटी 68 लाखांपेक्षा जास्त झाले आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने 12 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. मागील वर्षभरात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे 13 टक्क्यांहून अधिक नुकसान केले आहे.

सध्याची वाटचाल पाहता शेअर मार्केट तज्ञ या शेअर बाबत उत्साही दिसत आहेत. सप्टेंबर 2022 तिमाहीचे निकाल पाहिल्यास सारेगामा इंडिया कंपनीने एकूण 200.54 कोटी रुपये महसूल कमावला आहे. 179.15 कोटी रुपये या मागील वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत या तिमाहीचे उत्पन्न 11.94 टक्के जास्त आहे. या तिमाहीत कंपनीने कर कपातीनंतर कमावलेला एकूण निव्वळ नफा 46.11 कोटी रुपये होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stock Of SaReGaMa limited share price return on investment on 24 November 2022

हॅशटॅग्स

#Penny Stock(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x