 
						Penny Stocks | सौर ऊर्जा क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारत चालले आहे. भारतात सौर ऊर्जा क्षेत्रातील उद्योगांना भरपूर वाव आहे. अश्या एका सौर ऊर्जा क्षेत्रात व्यापार करणाऱ्या सोलर इंडस्ट्रीज इंडिया कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे. सोलर इंडिया कंपनीचे शेअर्स 30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, ते आता वाढून 3000 रुपयांवर ट्रेड करत आहेत. सोलर इंडस्ट्रीज इंडियाच्या शेअर्सनी आपल्या दीर्घकालीन भागधारकांना 10000 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे. सोलर इंडस्ट्रीज इंडियाच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 3946.90 रुपये आहे. त्याच वेळी, कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 1987.25 रुपये होती. 23 सप्टेंबर 2022 रोजी सोलर इंडस्ट्रीज इंडिया कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 3771 रुपयांच्या किमतीवर ट्रेड करत होते.
1 लाखावर दिला एक कोटीचा परतावा :
25 ऑगस्ट 2006 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज निर्देशांकावर सोलर इंडस्ट्रीज इंडिया कंपनीचे शेअर्स 29.81 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 23 सप्टेंबर 2022 रोजी सोलर इंडिया कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 3771 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. कंपनीच्या शेअर्सनी या कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 10000 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे. जर तुम्ही 25 ऑगस्ट 2006 रोजी सोलार इंडस्ट्रीज इंडियाच्या शेअर्समध्ये फक्त 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती, तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून 1.26 कोटी रुपये झाले असते.
10 वर्षांत 1 लाखावर दिला 19 लाख परतावा :
सोलर इंडियाच्या शेअर्सनी मागील 10 वर्षांत आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा मिळवून दिला आहे. 21 सप्टेंबर 2012 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये सोलर इंडियाचे शेअर्स 197.66 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 23 सप्टेंबर 2022 रोजी ह्या शेअर्सची BSE निर्देशांकावर 3771 रुपये पर्यंत गेली होती.जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी सोलर इंडस्ट्रीज इंडियाच्या शेअर्समध्ये फक्त 1 लाख रुपये लावले असते, आणि आपली गुंतवणूक दीर्घकाळासाठी होल्ड करून ठेवली असती, तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 19.07 लाख रुपये झाले असते.
एका वर्षातील परतावा :
सोलर इंडस्ट्रीज इंडियाच्या स्टॉकने एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना जवळपास 89 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी, चालू वर्ष 2022 मध्ये सोलर इंडीया ने गुंतवणूकदारांना 58 टक्केचा मल्टी बॅगर परतावा मिळवून दिला आहे. सोलर इंडस्ट्रीज इंडियाच्या शेअर्समधून मागील पाच वर्षात गुंतवणूकदारांनी 313 टक्के नफा कमावला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		