25 March 2023 9:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
आता निरव मोदी, ललित मोदी आणि मेहुल चोक्सी भारतात परतून स्वतःला OBC नेते घोषित करतील, भाजप त्यांचं स्वागत करेल - रवीश कुमार Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव धडाम झाले, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या SBI Bank mPassbook | पासबुक अपडेटसाठी आता SBI बँकेत जाण्याची गरज नाही, असं करा सहज ऑनलाईन अपडेट CIBIL Score | कर्जाचा EMI थकवल्याने डिफॉल्ट झाल्यावरही सिबिल स्कोर कसा सुधारू शकता पहा SIP Calculator | अशी SIP करा म्हणजे 4 वर्षांनंतर 15 लाख रुपयांची कार खरेदी करू शकाल, संपूर्ण गणित पहा Campus Activewear Share Price | भारतातील सर्वात मोठ्या स्पोर्ट्स फुटवेअर कंपनीचे शेअर्स स्वस्त झाले, गुंतवणूक करावी? डिटेल वाचा Pidilite Industries Share Price | करोडपती स्टॉक! गुंतवणूकदारांना करोडपती बनवणार शेअर स्वस्तात मिळतोय, खरेदी करणार?
x

Penny Stocks | 4 रुपये 88 पैशाचा पेनी शेअर पुन्हा फोकसमध्ये, गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी, स्टॉकबद्दल जाणून घ्या

Penny Stocks

Penny Stocks | सध्या शेअर बाजारात कोणता स्टॉक परतावा देईल आणि कोणता स्टॉक नुकसान करेल ह्याचा नेम नाही. शेअर बाजारात कधी कमालीची पडझड पाहायला मिळते, तर कधी शेअर बाजार अपेक्षेपेक्षा जास्त वाढलेला दिसतो. त्यातही स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स आजकाल आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम नफा कमवून देत आहेत. आज या लेखात आपण एका स्मॉल कॅप कंपनीची माहिती घेणार आहोत, ज्याने आपल्या भागधारकांना मजबूत नफा कमावून दिला आहे. आपण ज्या शेअर बद्दल चर्चा करतोय त्याचे नाव आहे “Vikas Lifecare”.

मागील तीन ट्रेडिंग सेशनमध्ये Vikas Lifecare कंपनीचा शेअर सातत्याने अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहे. 29 सप्टेंबर 2022 रोजी Vikas Lifecare कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किटला स्पर्श केले होते. यानंतर पुन्हा 30 सप्टेंबर आणि 3 ऑक्टोबर रोजीही विकास लाईफ केअर कंपनीच्या शेअर्समध्ये अप्पर सर्किट लागला होता. Vikas Lifecare कंपनी सध्या परकीय गुंतवणुकीच्या वाढीमुळे चर्चेत आली आहे. ह्या कंपनीत मागील काही काळात परकीय गुंतवणुकीचा ओघ प्रचंड वाढला आहे, त्यामुळे शेअरमध्ये सातत्याने अप्पर सर्किट लागत आहे. चला तर मग जाणून घेऊ Vikas Lifecare कंपनीच्या शेअर्सची कामगिरी कशी आहे?

शेअर होल्डिंग पॅटर्न :
NSE च्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार एप्रिल ते जून 2022 या तिमाहीत परकीय गुंतवणूकदारांकडे Vikas Lifecare या कंपनीचे 15.02,60,428 शेअर्स होल्ड होते. म्हणजेच कंपनीतील एकूण 12.21 टक्के हिस्सा परकीय गुंतवणूकदारांकडे आहे. परकीय गुंतवणूकदारांच्या एकूण 12.21 टक्के गुंतवणूक हिस्सा पैकी Forbs EMF कडे 4.39 टक्के, Nomura Singapore कडे 3.57 टक्के वाटा आहे. याशिवाय BNP Paribas आर्बिट्रेजकडे 2.04 टक्के वाटा आहे. विकास लाइफकेअर कंपनीचे मार्केट कॅप 637 कोटी रुपये आहे.

सध्या शेअरची किंमत :
जानेवारी 2022 मध्ये Vikas LifeCare कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक पातळी किमतीवर गेले होते, पण त्यानंतर शेअर मध्ये विक्रीचा दबाव वाढू लागला आणि शेअरची किंमत गडगडली. मागील एका महिन्यात कंपनीच्या शेअरच्या किमतीत 8.50 टक्क्यांची पडझड पाहायला मिळाली आहे. त्याच वेळी, जर तुम्ही 6 महिन्यांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली असती तर, सध्या तुम्हाला 11 टक्के तोटा सहन करावा लागला असता. 2022 या वर्षाच्या सुरुवातीला ज्या लोकांनी विकास लाइफकेअर या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांना सध्या 8.13 टक्के नफा मिळाला असणार. कंपनीच्या शेअरची किंमत 5 वर्ष 2.66 रुपये या किमतीवर स्थिर होती, त्यात आता वाढ होऊन शेअर 4.57 रुपयांपर्यंत गेला आहे. म्हणजेच पाच वर्षापूर्वीच्या किमतीच्या तुलनेत स्टॉक सध्या 80 टक्के वाढीव किमतीवर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stock of Vikas LifeCare Share price return on investment on 6 October 2022

हॅशटॅग्स

#Penny Stock(175)#Vikas LifeCare(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x