
Penny Stocks | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जोरदार खरेदी पाहायला मिळत होती. अशा काळात लार्ज कॅप कंपनीच्या शेअरमध्ये फारशी तेजी पाहायला मिळाली नाही, मते पेनी स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून देत होते. पेनी स्टॉक गुंतवणुकीच्या दृष्टीने स्वस्त शेअर्स असतात, मात्र त्यात जास्त तरलता नसल्याने त्यांना धोकादायक गुंतवणूक मानले जाते.
मात्र काही पेनी स्टॉक गुंतवणूकदारांना अल्पावधीत दुप्पट परतावा देणारे ही असतात. आज या लेखात आपण अशाच टॉप 3 पेनी स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यानी अवघ्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे.
शेखावती पॉली-यार्न लिमिटेड :
आज गुरूवार दिनांक 30 नोव्हेंबरला 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.35 टक्के घसरणीसह 1.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील पाच दिवसांत या कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना 21.05 टक्के नफा मिळवून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 130 टक्के परतावा कमावून दिला आहे.
युनिटेक लिमिटेड :
आज गुरूवार दिनांक 30 नोव्हेंबरला 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 6.33 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील पाच दिवसांत या कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना 20.84 टक्के नफा मिळवून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 147.13 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मेलस्टार इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीज लिमिटेड :
आज गुरूवार दिनांक 30 नोव्हेंबरला 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.18 टक्के घसरणीसह 4.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील पाच दिवसांत या कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना 11.84 टक्के नफा मिळवून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 97.67 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.