 
						Penny Stocks | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. निफ्टी-50 निर्देशक 105 अंकांच्या घसरणीसह 19,281 वर ट्रेड करत होता. तर बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 333 अंकांच्या घसरणीसह 64,919 अंकावर व्यापार करत होता. शेअर बाजारात प्रचंड विक्रीचा दबाव असताना अनेक कंपनीचे पेनी स्टॉक तेजीत धावत होते.
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी मिडकॅप निर्देशांक 0.11 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत होता. आणि निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांक 0.07 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत होता. निफ्टी मीडिया निर्देशांक किंचित वाढीसह ट्रेड करत होता. तर निफ्टी एफएमसीजी, निफ्टी बँक, निफ्टी आयटी इंडेक्समध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत होता.
सुरुवातीच्या काही तासात गौतम अदानी गृपचा भाग असलेल्या 10 पैकी आठ कंपन्यांचे शेअर्स विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत होते आणि तर अदानी विल्मर, अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते. अंबुजा सिमेंट कंपनीचे शेअर्स देखील 2 टक्क्यांपेक्षा जास्त घसरले होते, तर ACC लिमिटेड स्टॉक 1.44 टक्क्यांनी पडला होता.
शुक्रवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या काही तासात पतंजली फूड, इन्फोसिस लिमिटेड, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, अॅक्सिस बँक, मारुती सुझुकी इंडिया, फेडरल बँक, मुथूट फायनान्स, एसबीआय कार्ड्स या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत होता. आणि याउलट गार्डन रीच शिपबिल्डर्स, बजाज फायनान्स, आयआरसीटीसी, टाटा मोटर्स आणि एसबीआय बँक या कंपनीच्या शेअरमध्ये भरघोस खरेदी पाहायला मिळत होती.
अप्पर सर्किट तोडणाऱ्या स्वस्त पेनी स्टॉकची लिस्ट
- नागार्जुन फर्टिलायझर्स
- श्रेयस इंटरमीडिएट
- शेल्टर इन्फ्रा
- पिक्चर हाऊस मीडिया
- एलांगो इंडस्ट्रीज
- इन्फ्रा इंडस्ट्रीज
- तामिळनाडू टेलिकॉम
- बिर्ला टायर्स
- टी स्पिरिच्युअल वर्ल्ड
- मारुती सिक्युरिटीज लिमिटेड

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		