
Penny Stocks | शुक्रवार, 27 डिसेंबर 2024 रोजी या वर्षातील शेवटचे ट्रेडिंग पार पडणार आहे. शुक्रवारी शेअर बाजार निफ्टी 150 अंकांनी वाढून तो 23900 च्या वर पोहोचला होता. दरम्यान, शेअर बाजारातील ३ पेनी शेअर्स फोकसमध्ये आले आहेत जे गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देऊ शकतात.
शुक्रवारी ४२ शेअर्समध्ये अप्पर सर्किट आणि १० शेअर्सनी लोअर सर्किट हिट केला आहे. मात्र शुक्रवारी 3 पेनी फोकसमध्ये आले आहेत. या तीन पेनी शेअर्सची किंमत अवघी 48 पैसे ते 85 पैशाच्या दरम्यान आहे. या ३ पेनी शेअर्सची जोरदार खरेदी सुरु झाली आहे. या तीनही शेअर्सनी ५ टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट केला आहे.
GACM Technologies Share Price – NSE: GATECH
शुक्रवार, 27 डिसेंबर 2024 रोजी जीएसीएम टेक्नॉलॉजी शेअर 2.70 टक्के वाढून 0.76 रुपयांवर पोहोचला होता. जीएसीएम टेक्नॉलॉजी कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 2.20 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 0.62 पैसे होता. जीएसीएम टेक्नॉलॉजी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 63 कोटी रुपये आहे. शुक्रवारी जीएसीएम टेक्नॉलॉजी कंपनीचे 2662549 शेअर्स खरेदीसाठी होते. तर, 507799 विक्रीसाठी ठेवण्यात आले होते.
Siti Networks Share Price – NSE: SITINET
शुक्रवार, 27 डिसेंबर 2024 रोजी सिटी नेटवर्क्स कंपनी शेअर 0.85 टक्के घसरून 0.85 रुपयांवर पोहोचला होता. सिटी नेटवर्क्स लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 1.15 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 0.50 पैसे होता. सिटी नेटवर्क्स लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 74 कोटी रुपये आहे. गेल्या सहा महिन्यांत सिटी नेटवर्क्स शेअरने ३२ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
Sanwaria Consumer Share Price – NSE: SANWARIA
शुक्रवार, 27 डिसेंबर 2024 रोजी सांवरिया कन्झ्युमर कंपनी शेअर 0.49 रुपयांवर ट्रेड करत आहे. सांवरिया कन्झ्युमर लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 0.61 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 0.30 पैसे होता. सांवरिया कन्झ्युमर लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 36 कोटी रुपये आहे. YTD आधारावर या शेअरने 17.50% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.