
Penny Stocks | शेअर मार्केटमधे गुंतवणूक करताना एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, स्टॉक मार्केटमध्ये योग्य ठिकाणी पैसे लावले तर पैसे कमावणे खूप सोपे आहे, मात्र स्टॉक मार्केटचा मूलभूत ज्ञान नसल्यास तुम्ही सर्व पैसे गमावू शकता. जर तुम्ही योग्य वेळी योग्य स्टॉक्स मध्ये पैसे गुंतवले निवडले, आणि थोडा संयम बाळगला तर तुमचे पैसे अनेक पटीत वाढू शकतात. लोकांना करोडपती बनवणाऱ्या स्टॉकमध्ये असा एक स्टॉक आहे ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. आपण ज्या स्टॉकबद्दल चर्चा करत आहोत, त्याचे नाव आहे,”कजारिया सिरॅमिक्स”. भारतातील सिरॅमिक्स आणि व्हिट्रिफाइड टाइल्स क्षेत्रातील सर्वात मोठ्या प्रसिद्ध ब्रँड कजारिया सिरॅमिक्सने मागील 23 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घकाळ संयमाचे गोड फळ दिले आहे.
23 वर्षात 32955% परतावा :
कजारिया सिरॅमिक्स कंपनीची लिस्टिंग स्टॉक मार्केटमध्ये 23 वर्षांपूर्वी झाली होती. 1 जानेवारी 1999 पासून आजपर्यंतच्या चार्ट पॅटर्नचे निरक्षण केल्यास आपल्याला समजेल की, या स्टॉकने मागील 23 वर्षांपेक्षा जास्त कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. 1 जानेवारी 1999 रोजी कजारिया सिरॅमिक्स कंपनीचे शेअर्स फक्त 3.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, ज्यात वाढ होऊन स्टॉक आता 12 ऑक्टोबर 2022 रोजी 1123.15 रुपये किमतीवर पोहोचले आहे.
35000 चे झाले 1.15 कोटी :
जर तुम्ही 1 जानेवारी 1999 रोजी काजारिया सिरॅमिक कंपनीचा शेअर अवघ्या 3.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. सुरुवातीपासून आतापर्यंत या स्टॉकमध्ये 33 हजार टक्के वाढ झाली असून आता स्टॉक 1123.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच 1 जानेवारी 1999 रोजी या स्टॉकमध्ये तुम्ही 35 हजार रुपये गुंतवले असते, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1 कोटींहून अधिक झाले असते. त्याच वेळी, ज्याने सुरवातीच्या काळात या कंपनीमध्ये एक लाख रुपये गुंतवले होते, त्यांची गुंतवणूक वाढून आता 3.29 कोटी रुपये पेक्षा अधिक झाली असती.
मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये काजारीया सिरॅमिक कंपनीचे शेअर्स 6.09 टक्क्यांनी पडले आहेत. जर आपण मागील 5 वर्षांच्या चार्ट पॅटर्नचे निरक्षण केल्यास समजेल की, गेल्या पाच वर्षात या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 55 टक्क्यांपर्यंत परतावा मिळवून दिला आहे. कजारिया सिरॅमिक्सच्या शेअरमध्ये चालू वर्षात आतापर्यंत 14.55 टक्के घसरण पाहायला मिळाली आहे. कंपनीच्या शेअरची मागील 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1374.90 रुपये आहे. आणि मागील 52 आठवड्यांची नीचांकी पातळी किंमत 885.30 होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.