
Penny Stocks | अॅल्युमिनियम, तांबे आणि जस्त धातूंचे वस्तू बनवणाऱ्या प्रिसिजन वायर्स इंडिया या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना खुशखबर दिली आहे. कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना बोनस शेअर्स वाटप करणार आहे. प्रेसिजन वायर्स इंडिया कंपनी आपल्या शेअर धारकांना 1 : 2 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करणार आहे. कंपनीने प्रत्येक 2 शेअर्सवर 1 बोनस शेअर मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रिसिजन वायर्स इंडिया कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक्स-बोनस किमतीवर ट्रेड करत होते. बोनसच्या रेकॉर्ड तारखेला या कंपनीचे शेअर्समध्ये 13 टक्क्याची उसळी पाहायला मिळाली होती, आणि शेअर 79.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज प्रिसिजन वायर्स इंडिया कंपनीचे शेअर्स 68.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
प्रिसिजन वायर्स इंडिया कंपनीच्या शेअर्सनी मागील 3 वर्षांत आपल्या शेअर धारकांना 700 टक्के परतावा कमावून दिला आहे. 3 एप्रिल 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 13.63 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. बीएसई निर्देशांकावर 21 डिसेंबर 2022 रोजी प्रेसिजन वायर्स इंडिया कंपनीचे शेअर्स 105.90 रुपयांवर क्लोज झाले होते. आज मात्र शेअर लाल निशाणीवर ट्रेड करत आहे. जर तुम्ही 3 एप्रिल 2020 रोजी प्रेसिजन वायर्स इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 7.76 लाख रुपये झाले असते.
20 वर्षांत दिला 6800 टक्के परतावा :
प्रिसिजन वायर्स इंडिया कंपनीच्या शेअर्सने मागील 20 वर्षांत आपल्या शेअर धारकांना बक्कळ कमाई करून दिली आहे. 3 जानेवारी 2003 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 1.86 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. बीएसई इंडेक्सवर 21 डिसेंबर 2022 रोजी प्रेसिजन वायर्स इंडिया कंपनीचे शेअर्स 105.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 130.95 रुपये होती. त्याच वेळी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 57 रुपये होती. या कंपनीचे बाजार भांडवल 1344 कोटी रुपये आहे. जुलै-सप्टेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत या कंपनीने 721.32 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील तिमाहीत कंपनीने 14.61 कोटी रुपये नफा कमावला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.