28 March 2023 7:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Saving Account | एका व्यक्तीला बँक सेविंग अकाऊंटची मर्यादा किती आहे? हे नियम लक्षात ठेवा अन्यथा नुकसान Minimum Salary of EPF | तुमचा किमान पगार किती आहे? कारण पेन्शनची रक्कम वाढणार, नवा प्लॅन लक्षात ठेवा Business Idea | कधीही बंद न पडणाऱ्या या व्यवसायात उतराल तर मोठी कमाई कराल, सरकारी मदत सुद्धा मिळतेय Horoscope Today | 29 मार्च 2023 | 12 राशींमध्ये बुधवारचा दिवस कोणासाठी कसा असेल? पहा तुमचं बुधवारचं राशीभविष्य Balkrishna Industries Share Price | पैसाच पैसा! या शेअरने गुंतवणुकदारांना 41,664% परतावा देत करोडपती बनवलं, स्टॉक बद्दल जाणून घ्या Multibagger Stocks | मार्ग श्रीमंतीचा! या 11 शेअर्सनी फक्त 1 महिन्यात 164 टक्क्यांपर्यंत परतावा दिला, शेअर्सची किंमतही कमी Numerology Horoscope | 29 मार्च, तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
x

Penny Stocks | फक्त 10 रुपयांच्या या पेनी स्टॉकने केली कमाल, 10 दिवसात पैसे दुप्पट, तुम्हाला परवडेल खरेदीला?

Penny Stocks

Penny Stocks | पेनी स्टॉक मध्ये गुंतवणूक करणे थोडे धोकादायक मानले जाते. असे बरेच पेंनी स्टॉक आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती केले आहे. आज आपण अश्याच एका पेनी स्टॉक बद्दल माहिती घेणार आहोत. ह्या स्टॉकचे नाव आहे Valencia Nutrition Ltd. दहा दिवसांपूर्वी ह्या स्टॉकमध्ये ज्यांनी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली त्यांना आज 1.94 लाख रुपयांचा परतावा मिळाला असणार. मागील ट्रेडिंग सेशनमध्ये हा शेअर 19.32 रुपये किमतीवर बंद झाला होता. तो कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर ट्रेड करत होता.

Valencia Nutrition Ltd कंपनीच्या शेअर्स नी मागील 10 दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. 5 सप्टेंबर 2022 रोजी Valencia Nutrition कंपनीचे शेअर्स 10.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 19 सप्टेंबर रोजी या कंपनीच्या शेअरने 21.25 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत गाठली होती. या कालावधीत Valencia Nutrition कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 94.05 टक्केचा भरघोस परतावा कमावून दिला आहे. सेन्सेक्समध्ये या काळात 0.72 टक्के म्हणजेच 43 अंकांची घसरण झाली आहे. मागील पाच ट्रेडिंग सेशन मध्ये हा स्टॉक 45.55 टक्के वधारला आहे.

1 लाखाच्या गुंतवणूकीवर 1.94 लाखाचा परतावा :
जर तुम्ही दहा दिवसापूर्वी या शेअर्समध्ये फक्त 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि आपल्या गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती, तर आहा तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.94 लाख रुपये झाले असते. मागील ट्रेडिंग सेशनमध्ये हा शेअर 19.32 रुपयांवर बंद झाला होता. तो कालच्या ट्रेडिंग सेशन मध्ये स्टॉक मध्ये 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट लागला होता. बीएसईवर कंपनीचे बाजार भांडवल 11.87 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. व्हॅलेन्सिया न्यूट्रिशनचा स्टॉक 5 दिवस, 20 दिवस आणि 50 दिवसांच्या मुविंग सरासरीपेक्षा जास्त किमतीवर ट्रेड करत आहे. परंतु 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मुविंग सरासरी किमतीपेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहे.

12 प्रमोटर्सकडे 35.67 लाख शेअर्स होल्ड आहेत :
आर्थिक वर्ष 2022 च्या जूनच्या पहिल्या तिमाहीत, 91 सार्वजनिक भागधारकांकडे कंपनीचे 36.12 टक्के शेअर्स होते. अंदाजे शेअर्सची संख्या 20.17 लाख शेअर्स होती. मागील जून तिमाहीत कंपनीच्या 12 प्रमोटर्सकडे एकूण 63.88 टक्के म्हणजेच 35.67 लाख शेअर्स होते. सध्या 60 सार्वजनिक भागधारकांकडे कंपनीचे 2.56 लाख शेअर्स आहेत. 2 लाखांपर्यंत वैयक्तिक भागभांडवलचे प्रमाण 4.60 टक्के आहे. 16 इतर सार्वजनिक भागधारकांकडे कंपनीचे 11.42 लाख शेअर्स आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stocks of Valencia Nutrition Ltd share price return on 20 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x