26 May 2024 11:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 27 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 27 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budhaditya Rajyog 2024 | बुधादित्य राजयोग, 3 राशींचे नशीब चमकणार, पैसा संपत्तीसाठी अत्यंत शुभं काळ ठरणार SBI Mutual Fund | नोकरदारांनो! 'या' 5 म्युच्युअल फंड योजनेतील बचत 1 कोटी पर्यंत परतावा देईल, नोट करा Railway Confirm Ticket | कन्फर्म रेल्वे तिकीट दुसऱ्याची आणि प्रवास तुमचा, नेमकं काय होईल? काय करावं लक्षात ठेवा Bank Account Alert | पगारदारांनो! पैशासंबंधित 'या' 5 गोष्टी करत असाल तर सावधान, मोठा आर्थिक फटका बसेल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव 2186 रुपयांनी धडाम झाला, पटापट शहरातील नवे दर तपासून घ्या
x

Penny Stocks | शेअरची किंमत 52 रुपये! एका वर्षात दिला 2244 टक्के परतावा, दररोज अप्पर सर्किट हीट

Penny Stocks

Penny Stocks | व्हाइसरॉय हॉटेल्स कंपनीच्या शेअर्सने अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. ज्या लोकांनी सहा महिन्यांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रूपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 18.66 लाख रुपये झाले आहे. मागील अनेक दिवसांपासून या कंपनीचे अप्पर सर्किट हीट करत आहेत. ( व्हाइसरॉय हॉटेल्स कंपनी अंश )

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्हाइसरॉय हॉटेल्स कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 50.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 1.75 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 318.32 कोटी रुपये आहे. आज बुधवार दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी व्हाइसरॉय हॉटेल्स कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 52.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

व्हाइसरॉय हॉटेल्स ही कंपनी पूर्वी पॅलेस हाइट्स हॉटेल्स या नावाने ओळखली जात होती. 1965 साली ही कंपनी व्हाईस रॉयल्टीमध्ये सामील करण्यात आली. पी प्रभाकर रेड्डी हे या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. 2007 साली या कंपनीचे शेअर 128 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र 2019 नंतर शेअर्सची किंमत 1.35 रुपयेवर आली होती. 2020 च्या सुरुवातीला व्हाइसरॉय हॉटेल्स कंपनीच्या शेअर्सची किंमत एक रुयेपेक्षा खाली आली होती. 19 ऑक्टोबर 2023 रोजी हा स्टॉक 3.60 रुपये किमतीवर पोहोचला होता. 3 एप्रिल 2024 रोजी या कंपनीच्या शेअर्सची किंमत 41.55 रुपये किमतीवर पोहोचली होती.

मागील एका वर्षात व्हाइसरॉय हॉटेल्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2244 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये परकीय संस्थागत गुंतवणूकदार किंवा देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केलेली नाही. प्रवर्तकांनी या कंपनीचे 95 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. या कंपनीचा फक्त 5 टक्के हिस्सा सार्वजनिक गुंतवणूकदारांनी धारण केला आहे.

व्हाईसरॉय हॉटेल्स लिमिटेड कंपनी हॉटेल रूम्स, रेस्टॉरंट्स आणि इतर सेवाच्या माध्यमातून कमाई करते. या कंपनीने डिसेंबर 2023 तिमाहीत 43.93 कोटी रुपये एकत्रित नफा कमावला होता. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 29.43 कोटी रुपये नफा कमावला होता. म्हणजेच मागील वर्षीच्या डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत डिसेंबर 2023 तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफा कमाईत 49.28 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. मागील वर्षी डिसेंबर तिमाहीत या कंपनीने 30,39 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks of Viceroy Hotels NSE Live 10 April 2024.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(476)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x