 
						Penny Stocks | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या काही तासात BSE सेन्सेक्स निर्देशांक 57 अंकांच्या वाढीसह 73215 अंकांवर ट्रेड करत होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 13 अंकांच्या वाढीसह 22230 अंकावर ट्रेड करत होता. शुक्रवारी भारती एअरटेल कंपनीचे शेअर्स जबरदस्त विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. तर डॉ. रेड्डीज लॅब्स कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात होते. Standard Capital Markets Ltd Share Price
अशा अस्थिरतेच्या काळात काही पेनी स्टॉक अप्पर सर्किट हीट करून आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल करत होते. असाच एक स्टॉक म्हणजे, स्टँडर्ड कॅपिटल मार्केट. शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी स्टँडर्ड कॅपिटल मार्केट स्टॉक 1.56 टक्के वाढीसह 3.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
स्टँडर्ड कॅपिटल या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 494 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळी 12 पैसे होती. या नीचांक किमतीवरून स्टँडर्ड कॅपिटल कंपनीचे शेअर्स 3000 टक्के मजबूत झाले आहेत. 27 फेब्रुवारी रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. हा बैठकीत संचालक इक्विटी शेअर्स, प्रेफरेंशियल इश्यू, राइट्स इश्यू किंवा कन्व्हर्टेबल सिक्युरिटीज जारी करून भांडवल उभारणीबाबत चर्चा करणार आहेत. त्यामुळे स्टँडर्ड कॅपिटल मार्केट कंपनीने संचालक मंडळाची बैठक झाल्यानंतर 48 तासांसाठी शेअर्सच्या ट्रेडिंगवर बंदी घालण्याची विनंती सेबीला केली आहे.
मागील 5 दिवसांत स्टँडर्ड कॅपिटल मार्केट कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 11.26 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2700 टक्के परतावा कमावून दिला आहे. 23 ऑगस्ट रोजी स्टँडर्ड कॅपिटल मार्केट कंपनीचे शेअर्स 12 पैशांवर ट्रेड करत होते. ज्या लोकांनी हा किमतीवर स्टॉक खरेदी केला होता, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 2700 टक्क्यांनी वाढले आहेत. 17 फेब्रुवारी 2012 रोजी या कंपनीचे शेअर्स स्टॉक तीन पैशांवर शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. या किमतीवरून स्टॉक तब्बल 11100 टक्के वाढला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		