
Penny Stocks | सध्या भारतीय शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. काल मुंबईत निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानामुळे शेअर बाजार बंद होता. मात्र मागील आठवड्यात शनिवारी विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 73960 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22502 अंकांवर क्लोज झाला होता. अशा अस्थिरतेच्या काळात तेजीत वाढणाऱ्या शेअर्समध्ये नेस्ले इंडिया, पॉवर ग्रिड, टाटा मोटर्स, हिंदाल्को, ओएनजीसी, डिवीज लॅब आणि टीसीएस कंपनीचे शेअर्स सामील होते.
विक्रीच्या दबावात ट्रेड करणाऱ्या शेअर्समध्ये जेएसडब्ल्यू स्टील, महिंद्रा, मारुती सुझुकी, एलटीआय माइंडट्री, अल्ट्राटेक सिमेंट, आयशर मोटर्स आणि एचडीएफसी लाईफ हे शेअर्स सामील होते. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करु इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे.
आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 7 शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, जे मागील आठवड्यात शुक्रवारी तेजीत वाढत होते. आणि पुढील काळात मजबूत परतावा कमावून देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ या सात शेअर्सबद्दल सविस्तर माहिती.
फ्युचर कंझ्युमर :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स पाच टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 22 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.55 टक्के वाढीसह 1.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. फ्यूचर कंझ्युमर ही कंपनी FMCG, अन्न आणि प्रक्रिया अन्न उत्पादनांचे सोर्सिंग, उत्पादन, ब्रँडिंग, विपणन आणि वितरण या संबंधित व्यवसाय करते.
संपन प्रॉडक्शन लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स पाच टक्क्यांच्या वाढीसह 26.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 22 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.85 टक्के वाढीसह 28.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. संपन प्रॉडक्शन लिमिटेड ही कंपनी मुख्यतः रबर आणि वीज उत्पादनाचा व्यवसाय करते.
श्रेनिक पेपर :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स पाच टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 22 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.26 टक्के वाढीसह 1.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. श्रेनिक पेपर ही कंपनी मुख्यतः कागदाचा लगदा, पेपर बोर्डच्या व्यापार आणि प्रक्रिया संबधित व्यवसाय करते.
हायब्रीड फायनान्शियल सर्व्हिसेस :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स पाच टक्क्यांच्या वाढीसह 10.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 22 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 11.83 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
ट्रान्सवॉरंटी फायनान्स :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्क्यांच्या वाढीसह 19.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 22 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.80 टक्के वाढीसह 19.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
Radaan Mediaworks India :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 4.76 टक्क्यांच्या वाढीसह 2.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 22 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.35 टक्के वाढीसह 2.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सुप्रीम इंजिनिअरिंग :
मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 4.17 टक्क्यांच्या वाढीसह 1.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 22 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.17 टक्के घसरणीसह 1.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.