 
						Penny Stocks | भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळाला. सुरुवातीच्या काही तासात बीएसई सेन्सेक्स 134.39 अंकाच्या कमजोरीसह 0.20 टक्क्यांनी घसरून 65,651.25 वर ट्रेड केट होता. त्याचप्रमाणे, NSE निफ्टी 35.55 अंकांच्या कमजोरीसह 0.18 टक्क्यांनी घसरून 19,461.75 अंकावर ट्रेड करत होता. असे काही शेअर्स होते, जे जबरदस्त तेजीत वाढत होते, तर काही शेअर्समध्ये विक्रीचा दबाव वाढला होता. टायटन कंपनीच्या शेअर्समध्ये सुरुवातीच्या काही तासात तीन टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. तर अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स दोन टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड कर होते.
चांगला परतावा देणाऱ्या स्टॉकच्या शोधात
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून कमाई करणारे लोक नेहमी चांगला परतावा देणाऱ्या स्टॉकच्या शोधात असतात. शुक्रवार दिनांक 7 जुलै 2023 रोजी दुपारनंतर बीएसई सेन्सेक्समध्ये 450 अंकांची घसरण पाहायला मिळाली होती. तर निफ्टी इंडेक्स 139 अंकांच्या घसरणीसह ट्रेड करत होता. सध्या भारतीय शेअर बाजार आपल्या उच्चांक पातळीवर पोहोचला आहे. इथून काही प्रमाणात करेक्शन पाहायला मिळू शकते. म्हणून गुंतवणूकदारांनी पैसे लावताना शेअर बाजारातील उलाढालीचा आढावा घेणे गरजेचे आहे.
शुक्रवारी दुपारनंतर शेअर बाजारात सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल निशाणीवर ट्रेड करत होते. टायटन, महिंद्रा अँड महिंद्रा, एसबीआय लाइफ आणि टीसीएस या सारख्या दिग्गज कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत होती. तर अदानी पोर्ट्स, पॉवर ग्रिड, इंडसइंड बँक आणि बजाज फायनान्स या दिग्गज कंपन्यांचे शेअर्स विक्रीच्या दबावात घसरणीसह ट्रेड करत होते. असे काही पेनी स्टॉक होते, जे अप्पर सर्किटमध्ये अडकले होते.
पेनी स्टॉक अप्पर सर्किटमध्ये
यामध्ये सुमित इंडस्ट्रीज लिमिटेड, सनगोल्ड कॅपिटल, अमित इंटरनॅशनल, जेडी ऑर्गोकेम, कॉन्स्ट्रोनिक्स इन्फ्रा, पार्कर अॅग्रोकेम, लॉर्ड ईश्वर हॉटेल्स, व्हिन्ट्रॉन इन्फॉर्मेटिक्स, सर्व्होटेक इंडस्ट्रीज, सीकोस्ट शिपिंग सर्व्हिसेस यासारखे स्टॉक सामील होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		