 
						Personal loan | आपल्याला आयुष्यात काही आर्थिक अडचणीमुळे किंवा वैयक्तिक कारणांमुळे अचानक कर्ज घेण्याची गरज भासू शकते. अशा परिस्थितीत, बँके कडून दिल्या जाणाऱ्या वैयक्तिक कर्जाशी संबंधित अटी व शर्तींची संपूर्ण माहिती आपण आधी जाणून घेणे गरजेचे असते. तुम्ही जर पगारदार कर्मचारी असाल तर कर्जचे पात्रता निकष पूर्ण केल्यावर तुम्हाला वैयक्तिक कर्ज सहज उपलब्ध होऊ शकते. साधारणपणे, बँकेने ठरवून दिलेल्या वैयक्तिक कर्जाच्या अटी पूर्ण करणे खूप सोपे असते. परंतु जर तुम या अटी पूर्ण करण्यात तुम्ही सक्षम नसाल किंवा पात्र नसाल, तर बँक तुम्हाला कर्ज देणे नाकारू शकते. यामध्ये अटीमध्ये सामान्यतः तुमचे वय, मासिक उत्पन्न, क्रेडिट स्कोअर यासह इतर घटकांचा समावेश होतो.
तुमचे वय एक महत्त्वाचा घटक :
वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी तुमचे वय एक महत्त्वाचा घटक मानला जातो. कारण तुमच्या वयावरुन तुमची कर्ज फेडण्याची क्षमता कळून येते. कर्ज घेताना तुमचे वय साधारणपणे 21 ते 67 वर्षांच्या दरम्यान असावे. निवृत्तीच्या जवळ असलेल्या व्यक्ती कर्ज घेताना जास्त कालावधीसाठी कर्ज घेऊ शकत नाही. कारण त्यांच्याकडे कमाईची खूप कमी वर्षे शिल्लक राहिली असतात. वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी तुमचे राहण्याचे ठिकाण म्हणजे शहर किंवा जिल्हा हा देखील एक मुख्य घटक मानला जातो.
कर्जाची वेळेवर परतफेड करण्याची क्षमता :
तुमचे मासिक उत्पन्न किंवा पगार तुमच्या कर्जाची वेळेवर परतफेड करण्याची क्षमता दर्शवते. सर्व बँक तुमच्या शहराच्या किंवा जिल्ह्याच्या आधारे किमान उत्पन्नाचे निकष ठरवते. उदाहरणार्थ, बजाज फिनसर्व्ह मधून कर्ज घेण्यासाठी किमान उत्पन्न मर्यादा 22,000 रुपये ठरवण्यात आले आहे. ही अट प्रत्येक बँकेत वेगळी आहे. सर्व बँकांच्या अटी वेगळ्या असतात. लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही कर्जासाठी अर्ज कराल, त्यापूर्वी कर्जाच्या सर्व अटी पूर्ण केल्या आहेत की नाही याची नोंद घ्या.
तुमचा मासिक खर्च :
मासिक उत्पन्नाव्यतिरिक्त, बँक तुमच्याकडून तुमचे निश्चित मासिक खर्चाचा तपशील देखील मागू शकते. कारण तुमचा मासिक खर्च हे देखील तुमच्या वैयक्तिक कर्जाची परतफेड करण्याची क्षमता दर्शवते. तुमचे कर्ज आणि उत्पन्न प्रमाण 50 टक्के पेक्षा अधिक असल्यास, बँक किंवा वित्तीय संस्था तुमचा अर्ज फेटाळू शकते. कर्ज आणि उत्पन्न यांच्यातील प्रमाण 40 टक्के किंवा त्यापेक्षा कमी ठेवण्याची सूचना आपल्याला केली जाईल.
क्रेडिट स्कोअर :
तुमचा कर्ज परतफेडीचा इतिहास आणि क्रेडिट स्कोअर एकमेकांशी संबंधित आहेत. तुमचा कर्ज परतफेडीचा इतिहास चांगला नसेल तर तुमचा क्रेडिट स्कोअरही खराब असू शकतो. त्यामुळे दोन्ही निर्देशांक सकारात्मक असणे खूप महत्त्वाचे आहे. हे निर्देशांक सर्व बँकांकडून तुम्हाला कर्ज देण्यापूर्वी विचारात घेतले जातील. तुमचा किमान क्रेडिट स्कोअर 750 किंवा त्याहून अधिक असावा तर तो चांगला मानला जातो. अंक बँकाही तसाच आग्रह धरतात. तुमचा क्रेडिट स्कोअर खराब झाला तरीही तुम्हाला थोडे फार कर्ज मिळू शकते, परंतु त्यातील अटी तुमच्या साठी जाचक असतील. सर्वसाधारणपणे, सर्व बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या वैयक्तिक कर्जासाठीच्या थोड्याफार प्रमाणात सारख्या असतात, पण नियमांचे तंतोतंत पालन केल्यास तुम्हाला सहज कर्ज मंजूर होऊ शकते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		