
Piccadily Agro Share Price | पिकाडिली अॅग्रो लिमिटेड हरियाणा स्थित मद्य कंपनीचे शेअर्स मागील तीन दिवसांपासून सतत अप्पर सर्किट तोडत आहेत. एकीकडे शेअर बाजारात मंदी पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे पिकाडिली अॅग्रो लिमिटेड कंपनीचे शेअर्स सलग दोन दिवस 20-20 टक्के अप्पर सर्किट तोडून आज देखील 5 टक्के पेक्षा जास्त वाढीसह ट्रेड करत आहेत.
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 185.45 रुपये किमतीवर ओपन झाल्यानंतर काही मिनिटांत शेअर 198.50 रुपये किमतीवर पोहचला होता. तर आज शुक्रवार दिनांक 6 ऑक्टोबर 2023 रोजी पिकाडिली अॅग्रो लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5.04 टक्के वाढीसह 208.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
एक लाखाचे झाले 79 कोटी
पिकाडिली अॅग्रो कंपनीच्या गुंतवणूकदारांनी या स्टॉकमधून अप्रतिम कमाई केली आहे. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे करोडो रुपयेने वाढवले आहेत. 11 जुलै 1997 रोजी पिकाडिली अॅग्रो लिमिटेड कंपनीचे शेअर 25 पैसे किमतीवर ट्रेड करत होते. ज्या गुंतवणूकदारांनी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, आता त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 79.31 कोटी रुपये झाले आहे. या कंपनीच्या गुंतवणूकदारांनी तब्बल 79300 टक्के नफा कमावला आहे.
शेअरची कामगिरी
3 ऑक्टोबर 2023 या कंपनीचे शेअर्स 115 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीला नुकताच सर्वोत्कृष्ट व्हिस्कीचा पुरस्कार मिळाला. आणि कंपनीच्या शेअर्सने रॉकेट सारखी उड्डाण भरली. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 198.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
या स्टॉकने मागील सहा महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 314 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. तर 2023 या वर्षात कंपनीच्या शेअरची किंमत 350 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 439 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. तर मागील 5 वर्षांत या कंपनीचे शेअर्स 1449 टक्के वाढले आहेत.
गुंतवणूकदारांची कमाई
तीन दिवसांपूर्वी पिकाडिली अॅग्रो कंपनीला जगातील सर्वोत्कृष्ट सिंगल माल्ट व्हिस्की बनवणाऱ्या कंपनीचा पुरस्कार जाहीर झाला होता. ही बातमी येताच शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी करायला सुरुवात केली. अवघ्या तीन दिवसांत या कंपनीचे शेअर्स 70 टक्के वाढले आहेत.
मंगळवारी या कंपनीचे शेअर 20 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर बुधवारी देखील या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांनी वाढले होते. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पिकाडिली अॅग्रो लिमिटेड कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 198.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज देखील या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.