14 December 2024 12:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

भारतात मोठे फ्रॉड करून परदेशात पळालेले नीरव मोदी आणि ललित मोदींना चोर म्हणणं हा 'ओबीसी अपमान'? भाजप विरोधात संतापाची लाट येणार

Congress leader Rahul Gandh

BJP OBC Politics | राहुल गांधी यांच्या लोकसभा सदस्यत्व संपुष्टात येण्याचा संबंध ओबीसींच्या अपमानाशी जोडण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजप करत आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस विक्टिम कार्ड खेळू नये म्हणून भाजप अजब राजकारण करणार आहे. कारण, राहुल गांधींच्या शिक्षेला ‘ओबीसी अपमाना’चा परिणाम म्हणून चित्रित करण्याची भाजपची योजना आहे. देशात सर्वात मोठे फ्रॉड करून परदेशात पळून गेलेले नीरव मोदी ते ललित मोदी यांचा देखील प्रत्यक्ष संबंध ‘ओबीसी अपमाना’शी जोडून एक अजब राजकारण भाजप खेळणार आहे.

भाजप खासदारांची बैठक
राहुल गांधी अपात्र ठरल्यानंतर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि प्रल्हाद जोशी यांनी संसदेत भाजपच्या ओबीसी खासदारांची बैठक घेतली. राहुल गांधी यांनी ओबीसींचा अपमान केल्याचा आरोप सर्व ओबीसी खासदार करतील, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी काँग्रेसवर ओबीसीविरोधी असल्याचा आरोप केला आहे.

भाजप राष्ट्रीय अध्यक्षांचे अजब दावे
भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, राहुल गांधी संपूर्ण ओबीसी समाजाला चोर म्हणतात. त्यांना कोर्टात टीकेला सामोरे जावे लागते, पण माफी मागण्यास नकार देतात, यावरून त्यांचा ओबीसींबद्दलचा तिरस्कार किती खोलवर आहे, हे दिसून येते. 2019 मध्ये भारताच्या जनतेने त्यांना माफ केले नाही. त्याला 2024 मध्ये शिक्षा सुनावली जाईल असे आधीच म्हटले होते.

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी दावा केला आहे की, सकाळ पासून मला ओबीसी समाजाचे फोन येतं आहेत. एखाद्या राष्ट्रीय पक्षाचा नेता आडनावामुळे मागास समाजाचा अपमान करू शकतो का, हा प्रश्न ते विचारात आहेत असं त्यांनी म्हटलं आहे. पण मुळात मोदी नावाचा असा कोणता समाज यापूर्वी अस्तित्त्वात होता असं प्रतिप्रश्न विरोधक विचारात आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: BJP plans to give OBC caste angle to issue of Nirav Modi and Lalit Modi check details on 25 March 2023.

हॅशटॅग्स

#Congress leader Rahul Gandh(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x