 
						Pooja Entertainment Share Price | पूजा एंटरटेनमेंट कंपनीच्या शेअरमध्ये मंदीच्या काळात देखील जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पूजा एंटरटेनमेंट अँड फिल्म्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स पाच टक्क्यांच्या वाढीसह 218.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. पूजा एंटरटेनमेंट अँड फिल्म्स लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 109 कोटी रुपये आहे.
पूजा एंटरटेनमेंट कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 290 रुपये होती. आणि नीचांक किंमत पातळी 149 रुपये होती. आज गुरूवार दिनांक 26 ऑक्टोबर 2023 रोजी पूजा एंटरटेनमेंट अँड फिल्म्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 229.35 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
मागील 6 महिन्यांत पूजा एंटरटेनमेंट अँड फिल्म्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्के परतावा कमावून दिला आहे. पूजा एंटरटेनमेंट अँड फिल्म लिमिटेड कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, शनिवार दिनांक 28 ऑक्टोबर 2023 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनी आपल्या पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर वाटप करण्याचा निर्णय घेऊ शकते. पूजा एंटरटेनमेंट फिल्म लिमिटेड या कंपनीची स्थापना 1986 साली झाली होती.
पूजा एंटरटेनमेंट अँड फिल्म्स लिमिटेड ही कंपनी भारतात आणि परदेशात चित्रपट वितरण, निर्मिती आणि सह-निर्मितीचा व्यवसाय करते. ही कंपनी उच्च दर्जाचे कंटेंट निर्मिती करण्याचे आणि बॉलिवूड आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे वितरण करण्याचे काम देखील काम देखील करते. पूजा एंटरटेनमेंट अँड फिल्म लिमिटेडने या तिमाहीत 20 टक्के वाढीसह 15.69 कोटी रूपयेची विक्री साध्य केली आहे. मात्र कंपनीच्या निव्वळ नफ्यात नऊ टक्के घट पाहायला मिळाली आहे.
पूजा एंटरटेनमेंट अँड फिल्म्स लिमिटेड कंपनीने मागील आर्थिक वर्षात 90 टक्के वाढीसह 46.49 कोटी रुपये विक्री नोंदवली होती. यासह कंपनीचा निव्वळ नफा 2.5 टक्क्यांच्या वाढीसह 3 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मागील 3 वर्षांत पूजा एन्टरटेन्मेंट अँड फिल्म्स लिमिटेड कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना 230 टक्के नफा कमावून दिला आहे. तर 31 जुलै 2020 रोजी पूजा एंटरटेनमेंट अँड फिल्म्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 15 रुपये नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर आता 1500 टक्के वाढून सध्याच्या किमतीवर पोहचले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		