25 March 2023 11:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Scheme Balance | खुशखबर! PPF मध्ये पैसे गुंतवणाऱ्यांच्या खात्यात 31 मार्चला पैसे ट्रान्सफर होणार, अधिक जाणून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरची 2023, 2024, 2025, 2030 मध्ये टार्गेट प्राईस किती असेल? तज्ज्ञांचं मत पहा आता निरव मोदी, ललित मोदी आणि मेहुल चोक्सी भारतात परतून स्वतःला OBC नेते घोषित करतील, भाजप त्यांचं स्वागत करेल - रवीश कुमार Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव धडाम झाले, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या SBI Bank mPassbook | पासबुक अपडेटसाठी आता SBI बँकेत जाण्याची गरज नाही, असं करा सहज ऑनलाईन अपडेट CIBIL Score | कर्जाचा EMI थकवल्याने डिफॉल्ट झाल्यावरही सिबिल स्कोर कसा सुधारू शकता पहा SIP Calculator | अशी SIP करा म्हणजे 4 वर्षांनंतर 15 लाख रुपयांची कार खरेदी करू शकाल, संपूर्ण गणित पहा
x

PPF Calculator | तुम्हाला करोडपती बनवणारी सरकारी योजना, परताव्याची 100 टक्के हमी, दीर्घकालीन गुंतवणूक देईल भरघोस परतावा

PPF Calculator

PPF Calculator | PPF म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह योजना ही सरकारची गॅरंटीड रिटर्न स्कीम आहे, ज्याद्वारे तुम्ही दीर्घ काळ गुंतवणूक करून करोडपती देखील बनू शकता. हे खाते तुम्ही जवळच्या कोणत्याही बँक किवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अर्ज करून उघडू शकता.

पोस्ट ऑफिस पीपीएफ कॅल्क्युलेटर:
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ ही योजना ज्या गुंतवणूकदारांना दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी एक बेस्ट पर्याय आहे. या योजनेतील 15 वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीमुळे लोकांमध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले जाते. त्याच वेळी, इतर सर्व गुंतवणूक योजनांच्या तुलनेत PPF मध्ये व्याज परतावा देखील चांगला मिळत आहे. PPF ही सरकारची हमखास परतावा देणारी योजना आहे, ज्याद्वारे तुम्ही नियमित गुंतवणूक करून करोडपती बनू शकता. ही एक सुरक्षित योजना मानली जाते, यातील तुमचे पैसे कधीच बुडणार नाही.

गुंतवणुकीवर व्याज आणि फायदे :
मागील काही वर्षांत पीपीएफवरील व्याज सरकारने वेळोवेळी कमी केले आहे, परंतु तरीही या योजनेत सध्या वार्षिक 7.1 टक्के व्याजदराने परतावा दिला जात आहे. विशेषतः पगारी नोकरदार वर्गात ही एक अतिशय लोकप्रिय योजना आहे. बँकेच्या बचत खात्यात पैसे ठेवल्यास तुम्हाला फक्त 3 ते 3.5 टक्के वार्षिक व्याज दिला जातो, आणि मुदत ठेव अर्थात FD चे व्याज दरही तुलनेत बरेच कमी आहेत. PPF चा आणखी एक फायदा असा आहे की यात मिळणारा परतावा इक्विटींप्रमाणे बाजाराशी जोडलेले नाहीत. अनिश्चिततेच्या परिस्थितीतही, निश्चित व्याजानुसार तुम्हाला सर्व परतावा वेळेवर दिला जाईल. तर भांडवली बाजारातील गुंतवणूक बुडण्याचा खूप धोका असतो. ही एक सरकारी पोस्ट ऑफिस योजना असल्यामुळे यातली तुमची प्रत्येक गुंतवणूक सुरक्षित आहे.

मुदतपूर्तीवर किती परतावा मिळेल?
* कमाल मासिक ठेव मर्यादा :12,500 रुपये म्हणजेच 1.50 लाख प्रतिवर्ष
* वार्षिक व्याज दर : 7.1 टक्के चक्रवाढ व्याज
* वार्षिक 15 वर्षांच्या मुदतीनंतर मिळणारा परतावा : 40,68,209 रुपये
* एकूण गुंतवणूक : 22,50,000 रुपये
* एकूण व्याज लाभ : 18,18,209 रुपये

1 कोटी परतावासाठी लागणारा वेळ :
* कमाल मासिक गुंतवणूक : 12,500 रुपये (वार्षिक 1.50 लाख रुपये)
* वार्षिक परतावा व्याजदर : 7.1 टक्के चक्रवाढ
* 25 वर्षानंतरची मॅच्युरिटी रक्कम : रु 1.03 कोटी
* एकूण गुंतवणूक : 37,50,000 रुपये
* व्याज परतावा लाभ : 65,518,000 रुपये

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | PPF Calculator Investment returns in long term with benefits on 20 August 2022.

हॅशटॅग्स

#PPF Calculator(19)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x