PPF Investment | पीपीएफ गुंतवणूकदारांनो लक्ष द्या, या खास युक्तीने तुमचे पैसे वाढवा, मॅच्युरिटीला 1.5 कोटी परतावा मिळेल
PPF Investment | सार्वजनिक भविष्य निर्वाह योजना गुंतवणूकीचा सर्वात सुरक्षित आणि हमी परतावा देणारा गुंतवणूक पर्याय मानला जातो. या योजनेत तुम्हाला चांगल्या रिटर्न्ससह टॅक्स सेव्हिंगचा लाभ देखील घेता येतो. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला चक्रवाढ पद्धतीने व्याज परतावा दिला जातो. या योजनेत भारत सरकार सुरक्षेची हमी देते. चला तर मग जाणून घेऊ या योजनेत गुंतवणूक केल्यास परताव्याची गणना कशी करतात.
पीपीएफचे व्याजदर :
मागील काही दिवसात पीपीएफ योजनेतील व्याजदरात बदल होण्याची बातमी मिळत होती. परंतु सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत PPF मधील जुन्या व्याजदरात कोणताही बदल झाला नाही. 30 मार्च 2020 रोजी भारत सरकारने PPF योजनेतील व्याजदरात घट केली होती. त्यावेळी पीपीएफवरील व्याजदर कपात करून 7.1 टक्के करण्यात आला होता. आता डिसेंबरमध्ये संपणाऱ्या तिमाहीत या व्याजदरात बदल केले जातील असा अंदाज आहे.
1.5 कोटींचा परतावा कसा मिळतो? :
पीपीएफ खात्यात एका वर्षात कमाल 1.50 लाख रुपये जमा करता येतात. समजा, तुम्ही पीपीएफ खात्यात दरमहा 12500 रुपये गुंतवले, तर 15 वर्षांच्या मुदतीनंतर तुम्ही तुमचे पीपीएफ खाते 5-5 वर्षांच्या कालावधीसाठी वाढवू शकता, असे केल्याने 30 वर्षांनंतर, तुमच्या PPF खात्यामध्ये 1.5 कोटी रुपयेचा फंड तयार झाला असेल. यामध्ये तुमची गुंतवणूक फक्त 45 लाख असेल आणि त्यावर तुम्हाला चक्रवाढ पद्धतीने 1.09 कोटी रुपये परतावा मिळेल.
25 व्या वर्षी गुंतवणूक केल्यास मिळणारा परतावा :
PPF या सरकारी योजनेत तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक सुरू करून जितका जास्त काळ चालू ठेवल, तितका जास्त परतावा तुम्हाला मिळेल. समजा तुमचे सध्याचे वय 25 वर्षे आहे, आणि तुम्ही पीपीएफ मध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली, आणि दर वार्षिक 1.5 लाख रुपये जमा करत असाल तर तुमच्या वयाच्या 55 व्या वर्षी तुम्ही करोडपती झालेला असाल.
PPF मिळणारा व्याज :
PPF योजनेत गुंतवणूक केल्यास दर महिन्याला व्याज मोजले जाते, मात्र ते आर्थिक वर्षाच्या शेवटी तुमच्या PPF खात्यात जमा केले जाते. म्हणजेच, तुम्ही PPF योजनेत गुंतवणूक केल्यास दरमहा जे काही व्याज कमावता, ते 31 मार्च रोजी तुमच्या PPF खात्यात जमा केले जाते. पीपीएफ खात्यात पैसे कधी जमा करायचे याची कोणतीही निश्चित तारीख नाही. तुम्ही पीपीएफ खात्यात मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर पैसे गुंतवणूक करू शकता.
तुमच्या पीपीएफ खात्यावरील व्याज दर महिन्याच्या 1 ते 5 तारखेपर्यंत तुमच्या खात्यात उपलब्ध असलेल्या रकमेवर मोजले जाते. म्हणजेच, जर तुम्ही पीपीएफ खात्यात कोणत्याही महिन्याच्या 5 तारखेपर्यंत पैसे जमा केले तर त्या पैशावर त्याच महिन्यात व्याज मोजला जाईल. परंतु जर तुम्ही 5 तारखेनंतर म्हणजे 6 तारखेला पैसे जमा केले तर त्यावर मिळणारा व्याज पुढील महिन्यात मोजला जाईल.
PPF गणनेचे उदाहरण :
उदाहरण क्रमांक 1 :
समजा तुम्ही 5 एप्रिल रोजी तुमच्या PPF खात्यात 50,000 रुपये गुंतवले, आणि 31 मार्च पर्यंत तुमच्या खात्यात आधीपासूनच 10 लाख रुपये जमा होते, 5 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत, तुमच्या PPF खात्यातील एकूण रक्कम 10,50,000 रुपये असेल जी किमान शिल्लक रक्कम मानली जाते. तर या रकमेवर 7.1 टक्के दराने मासिक व्याज मोजला जातो, 7.1% / 12 X 1050000 = 6212 रुपये व्याज त्याच महिन्यात तुमच्या PPF खात्यात जमा केला जाईल.
उदाहरण क्रमांक 2 :
समजा तुम्ही PPF खात्यात 50000 रुपये 5 एप्रिलपर्यंत जमा केले नाहीत आणि नंतर 6 एप्रिल रोजी जमा केले. 5 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत तुमच्या खात्यातील किमान शिल्लक 10 लाख रुपये मानली जाईल. या रकमेवर 7.1 टक्के दराने व्याज परतावा मोजला जाईल. 7.1 टक्के / 12 X 10,00,000 = 5917 व्याज परतावा दिला जाईल.
जास्त परतावा मिळवा :
जर तुम्हाला जास्त व्याज परतावा मिळवायचा असेल तर, दर महिन्याच्या 5 तारखेपर्यंत PPF खात्यात पैसे जमा करा, जेणेकरून तुम्हाला त्या महिन्याचा व्याज परतावा मिळू शकेल. पीपीएफ वरील कमाल दीड लाखांच्या गुंतवणुकीवर कर सवलत मिळते. त्यामुळे जर तुम्हाला करसवलत लाभ मिळवायचा असेल तर नवीन आर्थिक वर्ष सुरू होताच 1 एप्रिल ते 5 एप्रिलदरम्यान संपूर्ण 1.5 लाख रुपये PPF खात्यात जमा करा. तर तुम्हाला त्यावर पूर्ण कर लाभ घेता येईल. जर तुम्ही मोठी रक्कम एकवेळ जमा करू शकत नसाल तर दर महिन्याच्या 5 तारखेपर्यंत पैसे PPF खात्यात जमा करा, जेणेकरून तुमचा त्या महिन्यातील जमा रकमेवर मिळणारा व्याज परतावा त्याच महिन्यात मोजला जाईल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| PPF Investment opportunities and returns in long term with benefits on 08 November 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी
- IREDA Share Price | IREDA शेअर ना ओव्हरबॉट ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत - SGX Nifty
- Smart Investment | स्मार्ट बचतीतून बनाल 1 कोटींचे मालक; गुंतवणुकीसाठी SIP चे माध्यम ठरेल फायद्याचे, असा वाढेल पैसा
- PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News
- Smart Investment | कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याआधी 'या' गोष्टींची पुरेपूर काळजी घ्या, अन्यथा तोटा होईल
- Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
- Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
- SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
- Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
- Metro Job | आता मेट्रोमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न होईल पूर्ण; अर्ज प्रक्रिया, पगार आणि पात्रता काय असेल जाणून घ्या