4 December 2024 2:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: VEDL Investment Tips | असा वाढेल पैशाने पैसा, तुमच्याकडील पैसे पुन्हा होतील डबल; या पर्यायांमध्ये गुंतवणूक करा - Marathi News Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IPO GMP | स्वस्त IPO आला रे, ग्रे-मार्केट'मध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा मिळेल - GMP IPO 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगा'बाबत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट, कर्मचारी आणि पेन्शनधारकांना धक्का Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SUZLON Horoscope Today | काहींचा सामाजिक क्षेत्रात सहभाग वाढेल तर काहींना मिळेल यशाची गुरुकिल्ली, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य
x

PPF Investment | बँक FD पेक्षा जास्त परतावा, दरमहा किमान रक्कम गुंतवणूक करा, मॅच्युरिटीवर 41 लाख मिळवा

PPF Investment

PPF Investment | अल्पबचत योजना गुंतवणूकदारांना सुरक्षित आणि हमखास परतावा मिळवण्याचा पर्याय उपलब्ध करून देतात, ज्यात पैसे बुडण्याची शक्यता खूप कमी असते. अशा अल्पबचत योजनेत लोकांना हमखास परतावा मिळवून देतात. काही योजना तर तुम्हाला सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP प्रमाणे दर महिन्याला गुंतवणूक करण्याची सुविधा देखील देतात. या योजनेचे नाव आहे, “सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी”. या योजनेला आपण PPF योजना म्हणूनही ओळखतो. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिस शाखेत भेट देऊ शकता. ही PPF स्कीम लोकांना इतर अल्पबचत योजनापेक्षा अधिक व्याज परतावा कमावून देते. या योजनेमध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमचे दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्ट सहज पूर्ण करू शकता.

कमाल गुंतवणूक मर्यादा रक्कम :
PPF या सरकारी योजनेत एका आर्थिक वर्षात कमाल 1.50 लाख रुपये रक्कम जमा करता येते. या योजनेत तुम्ही किमान 500 रुपये जमा करून गुंतवणूक सुरू करू शकता. या योजनेत तुम्ही दरमहा कमाल 12,500 रुपये जमा करून 12 महिन्यात वार्षिक गुंतवणूक मर्यादा पूर्ण करू शकता.

गुंतवणुकीवर परतावा :
दीर्घ काळासाठी गुंतवणुक करणाऱ्या लोकांसाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही योजना सर्वात पसंतीचा गुंतवणूक पर्याय आहे. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्ष आहे. PPF योजना गुंतवणूकदारांना दीर्घकालीन गुंतवणुक करण्यास प्रोत्साहन देते. त्याचबरोबर या सरकारी योजनेत गुंतवणूक केल्यास 7.1 टक्के दराने हमखास व्याज परतावा मिळतो.

मॅच्युरिटीवर किती परतावा मिळेल?
दरमहा कमाल गुंतवणूक : 12,500 रुपये
वार्षिक व्याज दर : 7.1 टक्के
किमान मॅच्युरिटी कालावधी : 15 वर्षे
मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम : 40,68,209 रुपये
एकूण गुंतवणूक: 18,18,209 लाख रुपये
व्याज परतावा रक्कम : 22,50,000 रुपये

PPF योजनेचे फायदे :
* PPF योजनेत गुंतवणूक केल्यास वार्षिक 7.1 टक्के दराने व्याज परतावा मिळतो. हा व्याजदर अनेक बँकांतील मुदत ठेवींपेक्षा तुलनेत खूप जास्त आहे.
* PPF योजनेत गुंतवणूक केल्यास चक्रवाढ पद्धतीने व्याज परतावा मिळतो.
* या योजनेअंतर्गत तुम्ही एकल खाते उघडून गुंतवणूक सुरू करु शकता. पालक आपल्या अल्पवयीन मुलाच्या नावाने खाते उघडून गुंतवणूक करू शकता.
* या योजनेत गुंतवणूक करण्याची किमान रक्कम मर्यादा 500 रुपये आणि कमाल ठेव मर्यादा 1.50 लाख आहे.
* ही योजना 15 वर्षात परिपक्व होते, आणि पुढील 5-5 वर्ष कालावधीसाठी वाढवता येते.
* PPF योजने अंतर्गत जमा केलेल्या रकमेवर आयकर कायदा कलम 80C अंतर्गत कर सवलत दिली जाते.
* एका वर्षात PPF खात्यात कमाल 1.5 लाख रुपये जमा करता येतात. पीपीएफ ठेवींवर मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम करमुक्त आहे.
* खाते उघडण्याच्या तारखेपासून एक वर्ष कालावधी पूर्ण झाला की, खातेधारक त्याच्या ठेवींवर कर्ज घेऊ शकतो.
* पीपीएफ ठेवींवर भारत सरकार सुरक्षा हमी देते. म्हणजे या योजनेत जमा केले तुमचे पैसे सुरक्षित राहतील.
* पीपीएफ खातेधारक एखाद्या कर्जाची परतफेड करू शकला नाही तर, त्याच्या खात्यात असलेली रक्कम कोणत्याही न्यायालयीन आदेश किंवा डिक्री अंतर्गत जप्त केली जाऊ शकत नाही. या योजनेला सर्व प्रकारच्या जप्तीपासून संरक्षण प्राप्त झाले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| PPF Investment scheme for Long term investment and earning huge returns on 5 December 2022

हॅशटॅग्स

#PPF Investment(66)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x