
Prakash Industries Share Price | प्रकाश इंडस्ट्रीज या पोलाद आणि वीजनिर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने वाढ पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांच्या वाढीसह 170.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. प्रकाश इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळी जवळ ट्रेड करत आहेत.
शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार मुकुल अग्रवाल आणि डॉली खन्ना यांनी देखील प्रकाश इंडस्ट्रीज कंपनीचे 1 टक्के पेक्षा जास्त स्टॉक धारण केले आहेत. मुकल अग्रवाल यांच्या पोर्टफोलिओमध्ये प्रकाश इंडस्ट्रीज कंपनीचे 25 लाख शेअर्स आहेत, ते डॉली खन्ना यांच्या पोर्टफोलिओमध्ये प्रकाश इंडस्ट्रीज कंपनीचे 17.98 लाख शेअर्स आहेत. आज गुरूवार दिनांक 12 ऑक्टोबर 2023 रोजी प्रकाश इंडस्ट्रीज स्टॉक 0.60 टक्के वाढीसह 177.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मुकुल अग्रवाल यांनी सप्टेंबर 2023 मध्ये प्रकाश इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 1.4 टक्के शेअर्स खरेदी केले होते. त्याच्या पोर्टफोलिओमध्ये या कंपनीचे 25 लाख शेअर्स आहेत. त्याच वेळी, डॉली खन्ना यांच्याकडे प्रकाश इंडस्ट्रीज कंपनीचे 1 टक्के म्हणजेच 17.98 लाख शेअर्स आहेत.
प्रकाश इंडस्ट्रीज ही कंपनी मुख्यतः स्टील उत्पादन युनिट चालवते, ज्यात पाईप, ट्यूब, स्टील बार, रॉड आणि वायर्स बनवण्याचे काम केले जाते. या कंपनीला 20 सप्टेंबर 2023 रोजी भास्करपारा, छत्तीसगड राज्यात व्यावसायिक कोळसा खाणकाम करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण खत्याची मंजुरी प्राप्त झाली आहे.
मागील 6 महिन्यात प्रकाश इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 221 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील काही महिन्यात प्रकाश इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सची किंमत प्रचंड वाढली आहे. 11 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 52.48 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 11 ऑक्टोबर 2023 रोजी हा स्टॉक 170.90 रुपये किमतीवर पोहोचला होता.
मागील 6 महिन्यांत प्रकाश इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 221 टक्के वाढवले आहे. मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 123 टक्के मजबूत झाली आहे. तर 10 जुलै 2023 रोजी प्रकाश इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 77.01 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. प्रकाश इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 47.35 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.