15 December 2024 8:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Pre Approved Loan | प्री-अप्रूव्ड लोन नाकारले जाऊ शकतात का? कारणं काय असू शकतात? प्रक्रिया आणि डीटेल्स लक्षात ठेवा

Pre Approved Loan

Pre Approved Loan | पर्सनल लोनच्या मदतीने तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता, कोणत्याही नवीन प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करु शकता, किंवा घर रेनोवेशन करु शकता. पर्सनल लोन घेऊन तुम्ही तुमच्या सर्व प्रकारच्या आर्थिक अडचणीवर मत करु शकता. बँक आणि वित्तीय संस्था अशा लोकांना कर्ज देणे पसंत करतात ज्यांची आर्थिक पार्श्वभूमी मजबूत आणि सक्षम आहे. याचा अर्थ असा होतो की, आर्थिक रित्या मजबूत पार्श्वभूमी असलेल्या ग्राहकांना कर्ज मिळण्याची शक्यता जास्त असते. अनेक वेळा बँका आणि वित्तीय संस्था आपल्या विश्वासू ग्राहकांना समोरून कर्जाची ऑफर देतात, अशा प्रकारच्या कर्जाला प्री-अप्रूव्ड कर्ज असे म्हणतात. या बँका आपल्या विश्वासू ग्राहकांना आधीच ते किती कर्ज घेऊ शकतात याची करून माहिती देतात. तुम्ही अशा Pre Approved लोनची ऑफर स्वीकारली असेल तर तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

प्री-अप्रूव्ड लोन म्हणजे काय ?
प्री-अप्रूव्ड हे असे विशेष प्रकारचे कर्जे आहेत, ज्यात कर्जदाता आपल्या कर्जदाराला आधीच कर्ज देण्याचे मान्य करतो. जेव्हा ग्राहक सर्व पात्रता निकष पूर्ण करतात, आणि कर्जदाता यावर सहमत असतो, तेव्हा ते आपल्या पात्र ग्राहकांना हे विशेष कर्ज देतात. अशा वेळी बहुतांश बँकांना आपल्या ग्राहकांच्या उत्पन्नाची पूर्ण माहिती असते. या प्रकरणात बँका तुमचा क्रेडिट स्कोअर आधीच तपासून ठेवतात, आणि त्याचे विश्लेषण करून बँका ठरवतात की ग्राहक या रकमेपर्यंत कर्जाची परतफेड करू शकतो की नाही. काही वेळा बँका आणि वित्तीय संस्था काही अतिरिक्त कागदपत्रे जसे की आयटीआर रिटर्न आणि उत्पन्नाचा पुरावा ग्राहकांकडून घेतात. जेणेकरून कर्ज परतफेड करण्याची क्षमता आणि उत्पन्नाच्या सद्यस्थितीचा आढावा घेता येईल.

प्री-अप्रूव्ड कर्ज नाकारले जाऊ शकते का?
प्री-अप्रूव्ड कर्ज बँका किंवा वित्तीय कंपनी द्वारे ऑफर केल्यानंतरही काही विशेष कारणांमुळे नाकारली जातात. जेव्हा तुम्ही प्री-अप्रूव्ड कर्जासाठी अर्ज करता तेव्हा तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रे बँकेला सादर करावे लागते. ही कागदपत्रे सादर करण्यास उशीर झाला किंवा तुम्ही हे कागदपत्र देऊ शकला नाहीत, तर, हे प्री-अप्रूव्ड कर्ज नाकारले जाऊ शकते.

याशिवाय, बँकेकडे असलेले तुमचे तपशील किंवा कागदपत्र यात तफावत किंवा चूक असेल, तर बँक तुम्हाला प्री-अप्रूव्ड कर्ज देण्याचे नाकारू शकते. समजा तुमच्या पगारात अचानक घट झाली असेल, किंवा तुमचा क्रेडिट स्कोअर कमी झाला असेल तर बँका तुम्हाला कर देण्याचे नाकारू शकते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Pre Approved Loan Cancellation reasons and terms and conditions on 11 November 2022.

हॅशटॅग्स

#Pre-Approved Loan(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x