 
						Pricol Share Price | प्रिकॉल लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 1,200 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 190 टक्के वाढली आहे. या कंपनीचे उत्पादन केंद्र मुख्यतः कोईम्बतूर, मानेसर, पंतनगर, पुणे, सातारा आणि श्रीसिटीसह एकूण 8 ठिकाणी स्थित आहेत. तर जकार्तामध्ये देखील कंपनीचे उत्पादन प्रकल्प कार्यरत आहे. याशिवाय प्रिकॉल लिमिटेड कंपनीने टोकियो, सिंगापूर आणि दुबईमध्ये 3 आंतरराष्ट्रीय कार्यालये स्थापन केले आहेत. ( प्रिकॉल लिमिटेड कंपनी अंश )
प्रिकॉल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 211.25 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीच्या तुलनेत 90 टक्क्यांनी मजबूत झाले आहे. आज सोमवार दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी प्रिकॉल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.92 टक्के घसरणीसह 402.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ब्रोकरेज फर्म मोनार्क नेटवर्थ कॅपिटलने या कंपनीच्या शेअर्सवर ‘बाय’ रेटिंग देऊन 465 रुपये टार्गेटसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
सध्या प्रिकॉल लिमिटेड कंपनीने मेकॅनिकलवरून डिजिटल होण्याकडे वाटचाल सुरू केली आहे. कंपनीच्या ॲक्ट्युएशन कंट्रोल अँड फ्लुइड मॅनेजमेंट सिस्टीम विभागाला निर्यात क्षेत्रातील मंदीला तोंड द्यावे लागत आहे. तज्ञांच्या मते, “इव्ही सेगमेंटमध्ये प्रिकोल कंपनीच्या महसूल योगदानात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे.” प्रिकॉल लिमिटेड ही कंपनी इलेक्ट्रिक कूलंट पंप, इलेक्ट्रिक ओपल पंप, डिस्क ब्रेक आणि बीएमएस म्हणजेच बॅटरी व्यवस्थापन प्रणाली बनवण्याचा व्यवसाय करत आहे.
प्रिकॉल लिमिटेड ही कंपनी भारतात डॅशबोर्ड उत्पादन करणारी अग्रणी कंपनी मानली जाते. या कंपनीचे मुख्यालय कोईम्बतूर येथे स्थित आहे. ही कंपनी मुख्यतः ड्रायव्हर इन्फॉर्मेशन आणि कनेक्टेड व्हेईकल सोल्यूशन्स आणि ॲक्ट्युएशन, कंट्रोल आणि फ्लुइड मॅनेजमेंट सिस्टम्स बनवणारी अग्रगण्य कंपनी आहे. ही कंपनी ऑटोमोटिव्ह OEM सेवा देणाऱ्या दुचाकी-तीन चाकी वाहने, प्रवासी वाहने, व्यावसायिक वाहने, शेती उपकरणे आणि ऑफरोड वाहनांसंबंधित व्यवसाय करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		