 
						PSU Stocks | शेअर बाजारातील अस्थिरतेच्या काळात ऑइल इंडिया या तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. ब्रोकरेज हाउस एचडीएफसी सिक्युरिटीज फर्मने पुढील 2 महिन्यांसाठी ऑइल इंडिया स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( ऑइल इंडिया कंपनी अंश )
2024 यावर्षातील अवघ्या चार महिन्यात ऑइल इंडिया कंपनीचे शेअर्स 65 टक्क्यांनी वाढले आहे. आज गुरूवार दिनांक 2 मे 2024 रोजी ऑइल इंडिया स्टॉक 1.27 टक्के वाढीसह 628.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
HDFC सिक्युरिटीज फर्मने ऑइल इंडिया कंपनीच्या शेअर्सवर BUY रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काही महिन्यांत 676-725 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 590 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा दिला आहे. या स्टॉकची खरेदी रेंज 629.75-634 दरम्यान असेल.
30 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 622 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 16-17 टक्के अधिक वाढू शकतो. मागील 10 आठवड्यांच्या कन्सोलिडेशनमधून बाहेर येऊन या स्टॉकने मजबूत ब्रेकआउट दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची ट्रेडिंग व्हॉल्यूम देखील वाढत आहे. सध्या हा स्टॉक सर्व महत्त्वाच्या मूव्हिंग सरासरी किंमत पातळीच्या वर ट्रेड करत आहे. हे सकारात्मक तेजीचे लक्षण आहे.
मागील एका वर्षात ऑइल इंडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 145 टक्के परतावा कमावून दिला होता. मागील 6 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 105 टक्के वाढले होते. तर 2024 या वर्षात ऑइल इंडिया कंपनीचे शेअर्स 65 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत.
मागील एका महिन्यात ऑइल इंडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 4 टक्के नफा दिला आहे. तर अवघ्या एका आठवड्यात हा स्टॉक 5 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 669 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 240.65 रुपये होती. या कंपनीचे एकूण बजार भांडवल 67,265 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		