
PTC India Share Price | ‘पीटीसी इंडिया’ कंपनीच्या शेअर्समध्ये सलग तिसऱ्या दिवशी अप्पर सर्किट लागला आहे. बुधवार दिनांक 11 जानेवारी 2023 रोजी ‘पीटीसी इंडिया’ कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 4.96 टक्के वाढीसह 96.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ही पीटीसी इंडिया कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. जेव्हापासून गौतम अदानी या कंपनीत गुंतवणूक करणार आहेत, अशी बातमी पसरली आहे, तेव्हापासून या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त मोठी उसळी पाहायला मिळत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, PTC India Share Price | PTC India Stock Price | BSE 532524 | NSE PTC)
पीटीसी इंडियाचे स्पष्टीकरण :
PTC India कंपनीमध्ये NTPC, NHPC, पॉवर ग्रीड आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचा 4-4 टक्के भाग भांडवली वाटा आहे. या सर्व कंपन्या आपला वाटा विकू शकतात. ईटीच्या रिपोर्टनुसार या महिन्याच्या अखेरीस निविदा मागवल्या जाऊ शकतात. मात्र पीटीसी इंडिया कंपनीने प्रवर्तकांकडून शेअर्स विक्रीच्या प्रश्नाबद्दल अधिक माहिती नसल्याचे कळवले आहे. त्यांनी या बातमीबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे. अदानी उद्योग समूहाने जर पीटीसी इंडियाचे भागभांडवल खरेदी केले तर, अदानीचा ऊर्जा क्षेत्रातही दबदबा निर्माण होईल. पीटीसी इंडिया कंपनीची स्थापना 1999 साली झाली होती.
शेअरची कामगिरी :
मागील एका महिन्यात पीटीसी इंडिया कंपनीच्या शेअर्सची किमती फक्त 1.66 टक्क्यांनी वाढली होती. आणि मागील सहा महिन्यात शेअरची किंमत 15 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. जर तुम्ही 6 महिन्यापूर्वी या स्टॉकमध्ये पैसे लावले असते तर, तुमची गुंतवणूक 15 टक्के वाढली असती. मात्र मागील 5 दिवसात शेअरची किंमत 83 रुपये वरून 96.30 रुपयेवर गेली आहे. कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 114.90 रुपये आहे. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 67.50 रुपये होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.