 
						Public Provident Fund | पैसा जवळ असला की तो साठवून ठेवता येत नाही. तसेच घरात राहीला तर त्याचा काहीच फायदा होत नाही. त्यामुळे अनेक व्यक्ती त्यांच्याकडे असलेले जास्तीचे पैसे केणत्या ना कोणत्या योजनेत गुंतवत असतात. काहीजण आपल्या म्हातारपणासाठी, तर काही आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये पैसे गुंतवतात.
असे पैसे गुंतवत असताना त्यावर काही टक्के व्याज कमी मिळाले तरी चालेल. मात्र पैसा सुरक्षित राहीला पाहिजे अशी अनेकांची मानसीकता आहे. हिच बाब लक्षात घेत गेल्या अनेक वर्षांपासून पीपीएफ योजना नागरिकांची विश्वासहार्यता कमवण्यास सक्षम ठरली आहे. आजही या योजनेत अनेक व्यक्ती कोणतीही चिंता न बाळगता पैसे गुंतवत असतात.
तुम्ही देखील या योजनेत तुमचे गुंतवू शकता. कारण इथे सुरक्षितता पण आहे आणि फायदा देखील आहे. या योजनेचा लाभ कोणतीही व्यक्ती घेऊ शकते. नोकरी करणा-या व्यक्तींबरोबरच स्वत:चा व्यवसाय असलेल्या व्यक्ती देखील पैसे गुंतवू शकतात. सध्या तरी या योजनेतील गुंतवणूकीचा व्याजदर ७.११ टक्के आहे.
या योजनेत मॅच्युरिटीवरील वरील व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम तुम्हाला कर मुक्त मिळेल. म्युच्युअल फंड सारख्या ठिकाणी निश्चितच परतावा जास्त असतो. मात्र येथे संपूर्ण कालावधीत 20 टक्क्यांपर्यंत दीर्घकालीन भांडवली नफा कर घेतला जातो.
सेवानिवृत्ती आधी करा गुंतवणूक
सध्याच्या स्पर्धेच्या युगात पेन्शनचा पर्याय देखील बंद करण्यात आला आहे. त्यामुळे रिटायर झाल्यावर तुम्हाला लागणारी पैशांची या योजनेतून पुर्ण होऊ शकते. यामध्ये तुम्हाला चांगले रिटर्न मिळतात. नुकचत्यच झालेल्या एका सर्वेत रिटायरमेंटसाठी अनेकांनी पीपीएची निवड केल्याचे दिसले आहे. यात मॅच्यूरीटीचा कालावधी १५ वर्षांचा ठेवण्यात आला आहे.
जर तुम्ही दिवसाला १०० रुपये खात्यात जमा केले तर एका वर्षाचे ३६५०० रुपये जमा होतात. यासाठी १५ वर्षांचा कालावधी निवडला असेल आणि व्याज दर ७.१ टक्के मानला तर तुम्ह्ला एकूण ९.८९ लाख रुपये मिळतील. त्यामुळे १५ वर्षांत ही रक्कम ५४७५०० रुपयांवर पोहचेल. याचप्रमाणे २५ वर्षांसाठी तुम्ही ९१२५०० रुपये जमा केले असतील तर रिटर्नमध्ये २५०८२८४ रुपये तुमच्या खात्यात जमा होतील.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		