 
						Stock To Buy | सध्याच्या स्टॉक मार्केटमधील तेजीत जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल ही बातमी तुमच्या खूप फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा एका बँकिंग स्टॉकची माहिती देणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांचे खिसे पैशाने भरले आहे. आपण ज्या स्टॉक बद्दल चर्चा करत आहोत, त्याचे नाव आहे,”पंजाब नॅशनल बँक”. PNB स्टॉकवर लक्ष ठेवा. शेअर बाजारातील तज्ञ या बँकेच्या स्टॉकवर अतिशय उत्साही असून त्यांनी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. PNB चे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5.11 टक्के वाढीसह 53.45 रुपयांवर ट्रेड करत होते. शेअरखान स्टॉक फर्मच्या मते येणाऱ्या काही दिवसात हा बँकिंग स्टॉक 64 रुपयांची उच्चांक किंमत स्पर्श करू शकतो.
शेअर्सच्या किंमत वाढीचे कारण :
भारत सरकारने नुकताच PNB ला UTI अॅसेट मॅनेजमेंट कंपनीमधील भागविक्रीसाठी परवानगी दिली आहे. PNB ने स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, UTI AMC मधील संपूर्ण किंवा काही भाग एकल किंवा एकाधिक टप्प्यात निर्गुंतवणुकीसाठी DIPAM आणि वित्त मंत्रालयाने अंतिम मान्यता दिली आहे. ही बातमी.येताच PNB चे शेअर्स मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये सुसाट धावत सुटले आहेत. गेल्या पाच दिवसात स्टॉक 15 टक्के वधारला आहे.
स्टॉक बद्दल तज्ञांचे मत :
शेअरखानने नुकताच प्रसिद्ध केलेल्या अहवालात माहिती दिली आहे की, अपेक्षित रिटर्न रेशो प्रोफाइलच्या तुलनेत पीएनबी बँकेचा शेअरचे मूल्यांकन खूप स्वस्त आहे. बँकेची मजबूत कमाई वाढ आणि कर्ज वाढ, मार्जिनमधील सुधारणा, आणि कमी क्रेडिट खर्च यामुळे बँकेच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या अपेक्षा आहे. याशिवाय कॉर्पोरेट विभागातील कर्जाची वाढ सपाट राहिली आहे. PNB स्टॉक सध्या आपल्या ROE/FY2023-24 / FY25 ABV च्या अनुक्रमे 0.7 पट/ 0.6 पट / 0.5 पट अधिक मूल्यावर ट्रेड करत आहे. ब्रोकरेज फर्मने अंदाज व्यक्त केला आहे की, पीएनबी स्टॉक 64 रुपयांपर्यंत जाऊ शकतो, म्हणून गुंतवणूकदारांनी या सुधारित लक्ष्य किक्तीसाठी स्टॉक खरेदी करावा.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		