 
						PVR Share Price | नुकताच ‘पीवीआर’ कंपनीमध्ये ‘SBI म्युच्युअल फंड’, ‘ICICI प्रुडेन्शियल’, आणि फ्रेंच कंपनी ‘Societe Generale’ यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. ही बातमी प्रसार होताच ‘पीवीआर’ कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळाली होती. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये NSE इंडेक्सवर ‘पीवीआर’ कंपनीचे शेअर्स 2.50 टक्क्यांच्या वाढीसह 1,585 रुपयांवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 22 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.13 टक्के घसरणीसह 1,568.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (PVR Limited)
PVR मध्ये गुंतवणूक :
SBI म्युच्युअल फंडाने ‘पीवीआर’ कंपनीचे 229 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स खरेदी केले आहे. तर ‘ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड’ ने ‘पीवीआर’ कंपनीचे 100 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स खरेदी केले आहे. तर ‘सोसायटी जनरल’ फर्मने ‘पीवीआर’ कंपनीचे 51.20 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स खरेदी करून कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे. 2 म्युच्युअल फंड हाऊस आणि एका FPI फर्मने ‘पीवीआर’ कंपनीमध्ये एकूण 380 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
NSE BSE वेबसाइटवर उपलब्ध डेटानुसार ‘SBI म्युच्युअल फंड’ ने ‘पीवीआर’ कंपनीचे 14,69,650 शेअर्स प्रति शेअर 1559.35 रुपये किमतीवर खरेदी केले आहे. तर ‘ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड’ ने ‘पीवीआर’ कंपनीचे शेअर्स 1559.35 रुपये किमतीवर 6,41,300 शेअर्स खरेदी केले आहेत. परकीय गुंतवणूकदार फर्म Societe Generale ने देखील 1559.35 रुपये प्रति शेअर दराने 2.43 लाख शेअर्स अधिग्रहण केले आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		