2 May 2025 7:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Quick Money Share | काय सांगता! या टॉप 5 शेअर्सनी 5 दिवसात 53 पर्यंत परतावा दिला, शेअर्स नोट करा, पैसा वाढवा

Quick Money Share

Quick Money Share | मागील आठवड्यातील जबरदस्त पडझडीनंतर शेअर बाजारात सुधारणा पाहायला मिळत आहे. 25 नोव्हेंबर 2022 रोजी स्टॉक मार्केट 1 टक्क्यांची वाढीसह आपल्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचला होता. मागील आठवड्यात शेअर बाजारात कमालीची तेजी येण्याचे कारण म्हणजे जागतिक शेअर बाजारात आलेली तेजी, फेडरल रिझव्‍‌र्हकडून व्याजदर वाढ न होण्याची अपेक्षा, कच्च्या तेलाच्या किमतीत आलेली घसरण, एफआयआयने वाढवलेली गुंतवणूक, आणि यूएस बॉण्ड उत्पन्नातील घसरण यांचा सकारात्मक परिणाम भारतीय स्टॉक मार्केटमध्ये पाहायला मिळाला आहे.

BSE सेन्सेक्स इंडेक्स 600 अंकांच्या वाढीसह 62,294 अंकावर ट्रेड करत होता. निफ्टी-50 इंडेक्स 200 अंकांच्या वाढीसह 18,513 अंकावर ट्रेड करत होता. त्याच वेळी, निफ्टी मिडकॅप 100 इंडेक्स आणि स्मॉलकॅप 100 निर्देशांक प्रत्येकी 2 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. या कालावधीत 5 कंपनीच्या शेअर्सनी फक्त 5 दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांना 53.6 टक्के परतावा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सची अधिक माहिती.

हमिंगबर्ड :
हमिंगबर्ड ही एक स्मॉल कॅप कंपनी असून तिचे बाजार भांडवल 13.44 कोटी रुपये आहे. मागील आठवड्यात 5 ट्रेडिंग सेशनमध्ये या स्टॉकमध्ये 53.61 टक्क्यांची वाढ पहायला मिळाली होती. हा शेअर अवघ्या 5 दिवसापूर्वी 142.70 रुपयांवर ट्रेड करत होता, आता त्यात वाढ होऊन स्टॉक 219.20 रुपयांवर पोहोचला आहे. मागील शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या शेअरमध्ये 5 टक्क्यांची वाढ झाली आणि स्टॉक 219.20 रुपयांवर ट्रेड करत होता. गुंतवणूकदारांनी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते त्यांना 53.61 टक्के म्हणजेच 1.53 लाखांपेक्षा अधिक परतावा मिळाला आहे. स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावणे थोडे जोखीमीचे असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.

फिल्टर कन्सल्टंट्स :
फिल्टर कन्सल्टंट्स कंपनीच्या शेअर्सनेही मागील आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची किंमत 40 रुपयांवरून 59.90 रुपयांवर गेली आहे. अशा प्रकारे गुंतवणूकदारांनी या स्टॉकमध्ये पैसे लावून 49.75 टक्के परतावा कमावला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 49.26 कोटी रुपये आहे. गेल्या 5 दिवसात या कंपनीच्या स्टॉकमध्ये 49.75 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. हा परतावा FD सारख्या इतर सर्व गुंतवणूक पर्यायांपेक्षा अनेक पट फायदा मिळवून देणारा आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या स्टॉकमध्ये 17.45 टक्क्यांची वाढ झाली होती, आणि स्टॉक 59.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.

कॉन्कॉर्ड कंट्रोल :
कॉनकॉर्ड कंट्रोल कंपनीचे शेअर्स रिटर्न्स देण्याच्या बाबतीत इतर कंपनीच्या खूप पुढे आहे. मागील आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 46.65 टक्के परतावा कमावून दिला आहे. या शेअरची किंमत 194.95 रुपयांवरून 285.90 रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच या शेअरमध्ये गुंतवणूक करून लोकांनी 46.55 टक्के परतावा कमावला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 163.31 कोटी रुपये आहे. मागील शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 285.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

BSL Limited :
बीएसएल कंपनीच्या शेअर्सने मागील आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना मोठा नफा कमावून दिला आहे. हा स्टॉक एका आठवड्यात 153.20 रुपये किमतीवरून 224.65 रुपयांवर गेला आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून लोकांनी 46.64 टक्के परतावा कमावला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 231.21 कोटी रुपये आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 9.51 टक्क्यांच्या वाढीसह 224.65 रुपयांवर ट्रेड करत होता.

गर्ग फर्नेस : गर्ग फर्नेस कंपनीच्या शेअर्सने मागील आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स 47.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, ते आता वाढून 68.95 रुपयांवर पोहोचले आहे. म्हणजेच या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करून लोकांनी 46.39 टक्के परतावा मिळवला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 27.64 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. मागील शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 5 टक्क्यांच्या वाढीसह 68.95 रुपयांवर ट्रेड करत होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Quick Money Share List of Top 5 Stock increase money quickly in short term on 29 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Quick Money Share(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या