2 May 2025 9:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Quick Money Shares | काय सांगता! बँक FD नव्हे तर या बँकेच्या शेअरने 4 महिन्यांत 49% परतावा दिला, खरेदी करण्याचा सल्ला

Quick Money Share

Quick Money Shares | अॅक्सिस बँक या खाजगी क्षेत्रातील बँकेच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना मागील काही महिन्यांत 49 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 25 नोव्हेंबर 2022 रोजी ॲक्सिस बँकेचे शेअर्स किंचित वाढीसह 887.65 रुपये किमीवर ट्रेड करत होते. सध्या अॅक्सिस बँकेचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 3 टक्के डिस्काउंटवर उपलब्ध झाले आहेत. शेअर बाजार तज्ज्ञांच्या मते ॲक्सिस बँकेचे शेअर खरेदी करण्याची ही एकदम योग्य संधी आहे.

अॅक्सिस बँकेने मागील 3 वर्षात आपल्या तांत्रिक त्रुटी सुधारण्यासाठी तसेच पोर्टफोलिओमध्ये सुधारणा करण्यासाठी मोठी गुंतवणूक केली आहे. ॲक्सिस बँक अशा सुधारणा करण्यासाठी ही गुंतवणूक वाढवत राहील. सध्या ॲक्सिस बँकेचे जास्त लक्ष कंपनीचा नफा वाढवण्यावर आहे. आता बँकेच्या व्यापार वाढीचा सकारात्मक परिणाम कंपनीच्या मार्जिनवर स्टॉकच्या किमतीवर पाहायला मिळत आहे.

मागील चार महिन्यांच्या कालावधीत ॲक्सिस बँकेच्या शेअरची किंमत 49 टक्के वधारली आहे. 23 जून 2022 रोजी या बँकेच्या शेअरची किंमत वर्षातील सर्वात नीचांक पातळीवर गेली होती. तेव्हा हा स्टॉक 618.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. नीचांक किंमत पातळी स्पर्श केल्यानंतर शेअरमध्ये तेजी आली, आणि ॲक्सिस बँकेच्या स्टॉकमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण वाढले. अवघ्या चार महिन्यात ॲक्सिस बँकेच्या शेअरची किंमत 919.95 रुपयांवर गेली आहे. 919.95 रुपये ही ॲक्सिस बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी आहे.

अॅक्सिस बँक शेअरला बाय रेटिंग :
अॅक्सिस बँकेच्या शेअरची गुणवत्ता सुधारत आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजने अॅक्सिस बँकेच्या शेअरवर 1195 रुपये ही लक्ष्य किंमत निश्चित केली असून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. दुसरीकडे आयसीआयसीआय सिक्युरिटीज फर्मने अॅक्सिस बँकच्या शेअर्सची किंमत 1,130 रुपयांपर्यंत जाऊ शकते असा अंदाज व्यक्त केला आहे.

ॲक्सिस बँकेची आर्थिक बाजू :
2022-23 या चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत अॅक्सिस बँकेने 5,329.77 कोटी रुपये स्टँडअलोन नफा कमावला होता, जो गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत 70 टक्क्यांनी अधिक होता. बँकेच्या उत्पन्न डेटा नुसार वार्षिक आधारावर ॲक्सिस बँकेचे उत्पन्न 20,134 कोटी रुपयांवरून 24,180 कोटी रुपयांवर गेले आहे. बँकेने 20,239 कोटी रुपये व्याज उत्पन्न संकलित केले असून मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी त्यात 24 टक्क्यांनी वाढ पहायला मिळाली आहे. ॲक्सिस बँकेचा NPA 2.50 टक्क्यांवर आला आहे. अॅक्सिस बँकेचे बाजार भांडवल 2,72,816.90 कोटी आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Quick Money Share of Axis Bank share price has touched all time high price in market correction on 28 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Quick Money Share(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या