
Raamdeo Agrawal Portfolio | ‘मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस’ फर्मचे प्रवर्तक आणि संचालक ‘मोतीलाल ओसवाल’ यांनी शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्या कंपनीचे 16,600 इक्विटी शेअर्स खरेदी केले आहेत. या खरेदीनंतर ‘मोतीलाल ओसवाल’ यांच्या गुंतवणूकीचा हिस्सा 7,734,582 म्हणजेच 5.23 टक्के झाला आहे. त्यांच्याकडे पूर्वी 7,717,982 म्हणजेच 5.22 टक्के भाग भांडवल होते, आता त्यांनी 9,273,544 रुपये मूल्याचे अधिक शेअर्स खरेदी केले आहे.
रामदेव अग्रवाल पोर्टफोलिओ :
‘मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस’ कंपनीचे अन्य प्रवर्तक आणि संचालक ‘रामदेव अग्रवाल’ यांनी देखील खुल्या बाजारातून आपल्या कंपनीचे 20,000 इक्विटी शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. स्टॉक मार्केट डेटा दर्शवितो की, या नवीन रामदेव अग्रवाल यांची कंपनीतील एकूण होल्डिंग 39,920,601 इक्विटी शेअर्स म्हणजेच 26.98 टक्के झाली आहे. नवीन गुंतवणुकीपूर्वी रामदेव अग्रवाल यांच्याकडे 39,900,601 इक्विटी शेअर्स होते, त्यांचा गुंतवणूकीचा हिस्सा 26.97 टक्के होता, जो आता 26.98 टक्के झाला आहे. रामदेव अग्रवाल यांनी नुकताच खरेदी केलेल्या शेअर्सचे मूल्य 11,172,462 रुपये आहे. आज मंगळवार दिनाक 28 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.83 टक्के वाढीसह 569.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मोतीलाल ओसवाल कंपनीचे एकूण बाजार भांडवल 8,197.75 कोटी रुपये आहे.
52 आठवडयाची उच्चांक आणि नीचांक किंमत :
मोतीलाल ओसवाल कंपनीच्या शेअरची 52 आठवड्याच्या नीचांक पातळी किंमत 551.25 रुपये होती. तर या कंपनीच्या शेअरची उच्चांक किंमत पातळी 960 रुपये होती. सध्या हा स्टॉक आल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक पातळी किमतीच्या 73 टक्के खाली ट्रेड करत आहेत. मोतीलाल ओसवाल ही एक वित्त सेवा आणि गुंतवणुक करणारी कंपनी आहे. ही कंपनी रिटेल आणि संस्थात्मक ब्रोकिंग, खाजगी निधी व्यवस्थापन, शेअर बाजार गुंतवणूक या संबंधित वित्तीय सेवा प्रदान करण्याचे काम करते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.