1 May 2025 5:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, हि आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATAMOTORS Vodafone Idea Share Price | मोठी बातमी, पेनी स्टॉकमध्ये दिसू शकते मोठी तेजी, महत्वाची अपडेट आली - NSE: IDEA Vedanta Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल असलेला शेअर खरेदी करा; मोठा परतावा मिळेल - NSE: VEDL HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Trident Share Price | 26 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, महत्वाचे संकेत, यापूर्वी 5238% परतावा दिला - NSE: TRIDENT NTPC Share Price | 461 टक्के परतावा देणारा एनटीपीसी स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC
x

राफेल व्यवहारात 65 कोटीची दलाली | CBI, ED'कडे पुरावे पण चौकशी नाही - फ्रेंच मीडिया रिपोर्ट

Rafael Deal Scam

मुंबई, 08 नोव्हेंबर | भारतीय राजकारणात राफेल व्यवहार आता एक संशयास्पद मुद्दा बणून राहिला आहे. फ्रेंच विमान कंपनी दसॉ कडून भारताने तब्बल 36 राफेल लढावू विमाने खरेदी केली आहेत. हा खरेदी व्यवहार पूर्ण करण्यासाठी मध्यस्थ असलेल्या दलालास तब्बल 7.5 मिलीयन यूरो म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये सुमारे 650 मिलीयन अथवा 65 कोटी रुपये (Rafael Deal Scam) देण्यात आले. तसेच, भारतीय तपास यंत्रणा कागदपत्रे उपलब्ध असूनही या प्रकरणाची चौकशी करण्यास अयशस्वी ठरली, अशी चर्चा आहे. एक फ्रेंच पोर्टल मीडियापार्टने याबाबत एक रिपोर्ट जाहीर केला आहे. मीडिया पार्टने दावा करताना उल्लेखलेल्या कागदपत्रांची लेटेस्ट मराठी या कोणत्याही पुष्टी करत नाही.

Rafael Deal Scam. India has bought 36 Rafale fighter jets from French airline Dassault. A total of Rs 65 crore was paid to the broker to complete the purchase. Also, the Indian Investigation Agency failed to investigate the matter despite the availability of documents :

या ऑनलाईन पोर्टलने म्हटले आहे की, 59,000 कोटी रुपयांच्या राफेल व्यवहारात झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी केली जात आहे. मीडियापार्टने कथीत खोट्या Invoices प्रकाशित केल्या आहेत. यात दिसते की, दसॉने कथित दलाल सुशेन गुप्ता याला गोपनीय पद्धतीने दलाली दिली. पोर्टलने म्हटले आहे की, या कागदपत्रांची उपलब्धता असूनही भारतातील केंद्रीय तपास यंत्रणांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली नाही. तसे त्याबाबत ठोस पावलेही उचलली नाहीत.

मीडियापार्टच्या हवाल्याने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालय जवळ ऑक्टोबर 2018 पासून पुरावे आहेत. दसॉने राफेल विमान खरेदी ऑर्डर मिळविण्यासाठी सुशेन गुप्ता याला लाच दिली. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, हे पुरावे गोपनीय कागदपत्रांमध्ये उपलब्ध आहेत. दोन्ही संस्थांच्या वतीने आणखी एक भ्रष्टाचार प्रकरणात ऑकस्ता वेस्टलँड च्या व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर सप्लाय घोटाळ्यात चौकशीत बरेच काही पुढे आले आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी राफेल मुद्द्यावरुन अनेकदा केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणीत एनडीए सरकारवर हल्ला चढवत आले आहेत. राफेल प्रकरणात भ्रष्टाचार झाला असल्याच्या विधान आणि आरोपावर आपण आजही ठाम असल्याचे राहुल गांधी सांगतात.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Rafael Deal Scam Rs 65 crore was paid to the broker says Mediapart.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RafaelDeal(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या