
RailTel Share Price | मागील एका वर्षात रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. 2024 या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया स्टॉक तुफान तेजीत वाढत होता. आज देखील या रेल्वे कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे.
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया स्टॉक 9.88 टक्क्यांच्या वाढीसह आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक तेजीत वाढत आहे. आज मंगळवार दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया स्टॉक 0.27 टक्के वाढीसह 354 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
नुकताच रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीला 120 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. दक्षिण मध्य रेल्वेने रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीला 120.45 कोटी रुपये मूल्याचे काम दिले आहे. 27 डिसेंबर 2023 रोजी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीने सेबीला माहिती दिली की, कंपनीला 76.19 कोटी रुपये मूल्याचे काम मिळाले आहे.
मागील एका वर्षात रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 180 टक्के परतावा कमावून डील आहे. मागील एका वर्षात निफ्टी-50 इंडेक्स 19 टक्के मजबूत झाला आहे.
मागील दोन ट्रेडिंग सेशन रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीच्या शेअरची किंमत 23 टक्क्यांपेक्षा जास्त वाढली आहे. 1 जानेवारी 2024 रोजी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे शेअर्स 340.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 371.40 रुपये होती. तर या कंपनीच्या शेअरची नीचांक किंमत पातळी 96.20 रुपये होती.
सप्टेंबर 2023 तिमाहीत रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीने 613 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वर्षीच्या तुलनेत या कंपनीच्या महसूल उत्पन्नात तब्बल 40.50 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. या काळात रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या रेल्वे क्षेत्रातील कंपनीने 68 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.