
RailTel Share Price | रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 13.97 टक्क्यांच्या वाढीसह 483.65 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे शेअर्स 96.20 रुपये या आपल्या वार्षिक नीचांक किंमत पातळीवरून 402.76 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत.
मागील वर्षी 28 मार्च 2023 रोजी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे शेअर्स 96.20 रुपये या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे शेअर्स 3.42 टक्के घसरणीसह 453.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 41,000 कोटी रुपये मूल्याच्या 2,000 विविध रेल्वे प्रकल्पांना हिरवा कंदील दाखवला आहे. सध्या देशात सुरू असलेल्या रेल्वे विभागाच्या आधुनिकीकरण मोहिमेअंतर्गत, पीएम मोदी यांनी पुढील पाच वर्षांत रेल्वे विभागात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “भारत आज जगातील सर्वात वेगात वाढणारी अर्थव्यवस्था आहे. भारतात निर्माण होणाऱ्या आधुनिक पायाभूत सुविधा हे याचे सर्वात मोठे कारण आहे. पुढील पाच वर्षांत भारतात हजारो रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेची क्षमता वाढेल आणि देशात अधिक गुंतवणुकीला चालना मिळेल”.
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीच्या शेअर्सने मागील काही वर्षात नेत्रदीपक कामगिरी केली आहे. मागील दोन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 43 टक्क्यापेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 344 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. याशिवाय, रेल विकास निगम, IRFC, IRCON इंटरनॅशनल आणि Texmaco Rail या कंपन्यांच्या शेअर्सने देखील गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.