
RailTel Share Price | रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 9 जुलै 2023 रोजी पार पडली. आर्थिक वर्ष 2023-24 साठी कंपनीने पेड-अप शेअर भांडवलाच्या 10.5 टक्के म्हणजेच 1.05 रुपये प्रति शेअर अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. 2022-23 या मधील हा लाभांश कंपनीने आधीच अदा केलेल्या 1.50 रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांशाच्या व्यतिरिक्त असणार आहे.
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 132.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 11 जुलै 2023 रोजी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे शेअर्स 1.29 टक्के वाढीसह 133.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील पाच दिवसात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 2.78 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1.49 टक्के परतावा कमावून दिला आहे. YTD आधारे रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीच्या शेअरची किंमत 4.35 टक्के वाढली आहे.
मागील एका वर्षात रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 40.77 टक्के परतावा कमावून दिला आहे. नुकताच या कंपनीला नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर सर्व्हिसेसकडून उच्च उपलब्धता समाधानांसह ऑनसाइट SoC आणि NOC संबंधित 39.37 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर प्राप्त झाली आहे.
ब्रोकरेज फर्म प्रभुदास लिल्लाधर यांच्या मते, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे शेअर्स पुढील काही दिवसांत 160 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीची स्थापना 2000 साली झाली होती. रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही कंपनी देशव्यापी ब्रॉडबँड आणि VPN सेवा दूरसंचार आणि मल्टिमिडीया नेटवर्क तयार करण्याचे काम करते.
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनी भारतीय रेल्वेच्या ट्रेन कंट्रोल ऑपरेशन्स आणि सुरक्षा प्रणालींचे आधुनिकीकरण करण्याचे देखील काम करते. रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही कंपनी भारत सरकारची मिनीरत्न दर्जा असलेली कंपनी आहे. सध्या या कंपनीचे नेटवर्क भारतात 6,000 स्थानकांवर पसरले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.