 
						Railway Ticket Refund | रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वेने आपल्या प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेत त्यांच्यासाठी एक सुविधा केली आहे. आता पर्यंत आपले तिकीट बुक होउन लिस्टमध्ये नाव आल्यावर तिकीट कॅन्सल करता येत नव्हते. मात्र आता तसे करता येणार आहे. आपल्या प्रवाशांची गरज लक्षात घेत भारतीय रेल्वेने तिकीट कॅन्सलेशनवर रिफंड मिळणार असे सांगितले आहे.
अनेक वेळा आपले नाव ट्रेनच्या लिस्टमध्ये आलेले असताना काही घटनांमुळे आपला प्रवास रद्द होतो. अशा वेळी लिस्टमध्ये नाव आल्यावर तिकीट कॅन्सल होत नव्हते. मात्र आता तुम्ही लगेचच तिकीट कॅन्सलसाठी अप्लाय करून तुमचे पैसे परत मिळवू शकता. IRCTC ने त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली आहे. यासाठी तुम्हाला रेल्वे तिकीट काउंटकवर तुमच्या तिकीटाची रिसीप्ट देखील द्यावी लागेल. तिकीट कॅन्सल झाल्यावर तुमचे पैसे तुम्हाला परत केले जातील.
असे करा ऑनलाइन अप्लाय
* यासाठी आधी IRCTC च्या www.irctc.co.in या साइटवर जा.
* आता होम पेजमधून माय अकाउंटवर क्लिक करा.
* नंतर ड्राप डाउनमधून माय ट्रांजेक्शन सिलेक्ट करा.
* फाइल टीडीआरमध्ये तुमची फाइल निवडा.
* आता तुम्हाला तुमची सर्व माहिती यात दिसेल.
* यात पीएनआय क्रमांक टाका.  तसेच ट्रेन नंबर प्रविश्ट करा.
* पुढे कॅप्चा भरून रद्द करण्याचे ऑप्शन सिलेक्ट करा.
* यानंतर तुमच्य मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल.
* तो टाकून पुन्हा रद्दच्या ऑप्शनवर क्लिक करा.
* पुढे ठरावीक रक्कम कट करूना तुम्हाला किती रक्कम परत मिळणार आहे हे दिसेल.
* ओके वर क्लिक केल्यावर तुमच्या ट्रांजेक्शनचा मॅसेज येईल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		