30 April 2025 12:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स सेक्टर कंपनी शेअर्स खरेदी करून ठेवा, मोठा अपसाईड परतावा मिळेल - NSE: BEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सवर टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, 78 रुपये टार्गेट प्राईस जाहीर - NSE: SUZLON Mazagon Dock Share Price | मल्टिबॅगर शेअर रेकॉर्ड हाय लेव्हलवर, आता मोठ्या तेजीचे संकेत, टार्गेट अपडेट - NSE: MAZDOCK Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस, 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स देणार ही कंपनी, सुवर्ण संधी सोडू नका SBI Mutual Fund | श्रीमंत करणारी SBI फंडाची योजना, महिना 5,000 रुपये SIP वर मिळेल 2 कोटी 56 लाख रुपये परतावा
x

Jhunjhunwala Portfolio | झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओ मध्ये आहे हा जबरदस्त स्टॉक, गुंतवणुकीवर बंपर नफा निश्चित

Rakesh jhunjhunwala, federal bank, stock market

Jhunjhunwala Portfolio | राकेश झुनझुनवाला यांना शेअर मार्केटचा बिग बुल म्हंटले जाते. लाखो करोडो लोक त्यांना आपला आदर्श मानतात आणि त्यांच्यावर विश्वास करतात. त्यांच्या पोर्टफोलिओ मध्ये एक ९८ रुपये किमतीचा शेअर आहे ज्या वर अनेक गुंतवणूकदार विश्वास टाकत आहेत. गमतीशीर गोष्ट अशी की जे लोकं आता ह्या स्टॉक वर इंट्राडे ट्रेड करतील त्यांना बंपर नफा होईल असे तज्ञांचे मत आहे. बाजारातील विश्लेषक आणि तज्ञ राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील या स्टॉकवर सकारात्मक खरेदीचा सल्ला देत आहेत. तज्ज्ञाचा असा अंदाज आहे की येत्या काही ट्रेडिंग सेशन मध्ये हा स्टॉक १३९ रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.

राकेश झुनझुनवाला पोर्टफोलिओ स्टॉक :
शेअर बाजारातील तज्ञ राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या स्टॉकवर खरेदीचा सल्ला देत आहेत कारण त्यात एक सकारात्मक बदल होताना दिसत आहे . हा शेअर आहे फेडरल बँक (एफबी). उत्कृष्ट तिमाही निकालानंतर अनेक ब्रोकरेज कंपन्या या शेअरच्या बाबतीत सकारात्मक आहेत. फेडरल बँकेचे शेअर्स मागील शुक्रवारी एन एस इ वर ९८.६५ ₹ वर बंद झाले होते, त्या पूर्वी ९७.२९ रुपये वर ट्रेड करणारा हे शेअर ९८.६५ वर जाऊन पोहोचला जो की मागील बंदच्या तुलनेत १.४९ % जास्त आहे.

एका वर्षात १३.१३% परतावा :
मागील एक वर्षात स्टॉकने १४.७१% ची वाढ दाखवली आहे आणि वार्षिक वाढीच्या आधारावर २०२२ पर्यंत स्टॉक आतापर्यंत १३.१३% वाढला आहे. 25 ऑक्टोबर २०२१ रोजी NSE वर या शेअरने ₹ १०७.६५ या ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला होता. २७ ऑगस्ट २०२१ रोजी ह्या शेअर ने ५२ आठवड्याचा नीचांक गाठला आणि ७७.५० रुपये वर पोहोचला होता. त्यानुसार, स्टॉक सध्या त्याच्या ५२-आठवड्याच्या उच्च पातळीच्या ८.३६% खाली ट्रेड करतोय आणि त्याच्या ५२ आठवड्याची नीचांकी पातळी ही सध्या च्या किमतीच्या २७.२८% खाली आहे.

या स्टॉकचे लक्ष्य 130 रुपये प्रति शेअर :
राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओ मधील स्टॉक फेडरल बँकेने FY२०२३ च्या पहिल्या तिमाही चे निकाल जाहीर केल्यानंतर, ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल ह्या स्टॉकबाबत सकारात्मक आहे आणि मोतीलाल ओसवाल यांनी येत्या काही काळात ₹१३० प्रति शेअरची लक्ष्य किंमत गाठेल असा टार्गेट दिला आहे. १३०₹ ही किमत त्याच्या सध्याच्या बाजारभावाच्या ३१ टक्के आहे. त्याच वेळी, Emkay Global Financial Services ने प्रति शेअर 128 रुपये चे लक्ष्य गाठेल असा अंदाज वर्तवला आहे. तर एंजेल वनने त्याची लक्ष्य किंमत ₹ १२० ठेवली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत फेडरल बँकेचा निव्वळ नफा ६३.५% टक्क्यांनी वाढून ६०१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या दक्षिण भारतीय बँकेने वर्षापूर्वीच्या कालावधीत ३६७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. आणि आपल्या GNPA मध्ये सुधारणा पाहण्यासाठी, या तिमाहीत कंपनीने तिमाही ४- आर्थिक वर्ष २०२२ मध्ये २.८% आणि तिमाही १- आर्थिक वर्ष २०२२ ते तिमाही ४- आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ३.५% च्या तुलनेत २.६८% चा GNPA नोंदवला.

शेअरहोल्डिंग पॅटर्न :
मार्च २०२२ या तिमाहीसाठी फेडरल बँकेच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार बिग बुल राकेश झुनझुनवाला यांच्या बराच मोठा हिस्सा आहे, राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे या सर्वात मोठ्या दक्षिण भारतीय बँकेत शेअर होल्डींग आहेत. राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांची फेडरल बँकेत २,१०,००,००० म्हणजेच १.०१% टक्के हिस्सेदारी आहे. राकेश झुनझुनवाला यांच्याकडे फेडरल बँकेचे ५,४७,२१,०६० शेअर्स आहेत आणि या बँकेत त्यांचा २.६४ टक्के हिस्सा आहे. या दक्षिण भारतीय बँकेत झुनझुनवाला दाम्पत्याची एकूण ३.६५ टक्के हिस्सेदारी आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News title: Jhunjhunwala Portfolio Federal Bank Share Price 18 July 2022

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या