29 March 2024 4:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

Rakesh Jhunjhunwala To Start Akasa Air Airline | राकेश झुनझुनवाला यांच्या आकाश एअर इंडियाला केंद्राची मान्यता

Rakesh Jhunjhunwala To Start Akasa Air Airline

मुंबई, 12 ऑक्टोबर | नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने राकेश झुनझुनवाला यांच्या आकाश एअर या विमान कंपनीला भारतामधील वाहतुकीकरता एनओसी दिली आहे. कंपनीने ही माहिती सोमवारी जाहीर केली (Rakesh Jhunjhunwala To Start Akasa Air Airline) आहे. आकाश एअरची होल्डिंग कंपनी एएसएनव्ही एव्हिशन प्रा. लि. कंपनीने २०२२ मध्ये उन्हाळ्यात नवीन विमानसेवा सुरू करण्याचे उद्दिष्ठ निश्चित केले आहे.

Rakesh Jhunjhunwala To Start Akasa Air Airline. India’s billionaire investor Rakesh Jhunjhunwala is planning to start a budget airline with a fleet of 70 planes. According to the report, the prospective airline, Akasa Air, will be acquiring its fleet of aircraft over the four years :

आकाश एअरमध्ये गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला आणि जेट एअरवेजचे माजी सीईओ विनय दुबे यांची गुंतवणूक आहे. आकाश एअरचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर दुबे म्हणाले, की नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने एनओसी दिल्याने खूप खुश आहोत. आभारी आहोत. आकाश एअर यशस्वी पद्धतीने चालू करण्यासाठी सर्व नियमांचे पालन करणार आहोत. त्यासाठी नियामक प्राधिकरणासमवेत काम सुरू ठेवणार आहोत. आकाश एअरच्या संचालक मंडळात इंडिगोचे माजी अध्यक्ष आदित्य घोष यांचाही समावेश आहे.

एअरलाईनच्या योजनेनुसार आगामी चार वर्षांमध्ये सुमारे ७० विमानांद्वारे वाहतूक करण्याचा प्रयत्न आहे. एअरबसचे वाणिज्य अधिकारी ख्रिश्चियन शेरेर यांनी मागील आठवड्यात ही माहिती दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ ऑक्टोबरला भारतीय अर्थव्यवस्थेबाबत आशावादी दृष्टीकोन असलेल्या राकेश झुनझुनवाला यांची पंतप्रधान मोदी यांनी ५ ऑक्टोबरला भेट घेतली होती.

भेटीनंतर मोदी यांनी ट्विट करत म्हटले, की अनोखे राकेश झुनझुनवाला यांना भेटून आनंद झाला. जिवंत, व्यावहारिक आणि भारताबाबत ते खूप आशावादी आहेत. पंतप्रधान यांच्यासमवेत झालेल्या भेटीत काय चर्चा झाली, याबाबत आठ ऑक्टोबरमधील एका कार्यक्रमात राकेश झुनझुनवाला यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी लग्नाच्या पहिल्या रात्री पत्नीबरोबर काय बोललो याची माहिती तुम्हाला मी कशी देईन, असे गमतीने म्हटले होते. पंतप्रधानांशी अर्थव्यवस्थेबाबत चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Rakesh Jhunjhunwala To Start Akasa Air Airline With 70 Planes.

हॅशटॅग्स

#RakeshJhunjhunwala(50)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x