14 December 2024 12:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा Railway Ticket Booking | प्रवाशांनो इकडे लक्ष द्या; तात्काळ तिकीट बुकिंगचे टायमिंग बदलले, तिकिटांची नवीन वेळ जाणून घ्या SBI Mutual Fund | बिनधास्त SIP करा SBI फंडाच्या या योजनेत, 17 पटीने पैसा वाढेल, संधी सोडू नका, पैशाने पैसा वाढवा HAL Share Price | मल्टिबॅगर शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, टार्गेट नोट करा - NSE: HAL Horoscope Today | आजचा दिवस या 5 राशींसाठी असेल अत्यंत खास; दिवसभर बरसेल देवीची कृपा, पहा यामधील तुमची रास Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, ही संधी गमावू नका, स्टॉक चार्टवर महत्वाचे संकेत - NSE: RELIANCE Tata Group IPO | पैसे तयार ठेवा, टाटा गृपचा IPO येणार, अशी संधी सोडू नका, अनेक पटीने पैसा वाढेल - IPO GMP
x

Rama Steel Share Price | 16 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 10 दिवसात 50% परतावा दिला, फायदा घ्या - Marathi News

Highlights:

  • Rama Steel Share Price
  • दोन वर्षांत या शेअरने पैसे दुप्पट केले
  • कंपनी संरक्षण क्षेत्रात व्यवसाय विस्तार करणार
  • Ebisu ग्लोबल अपॉर्च्युनिटीज फंडने 3 कोटी शेअर्स खरेदी केले
Rama Steel Share Price

Rama Steel Share Price | रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मागील 2 आठवड्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 50 टक्क्यांनी (NSE: RamaSteel) मजबूत झाली आहे. गेल्या एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्समध्ये 33 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. 11 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 15.47 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,315 कोटी रुपये आहे.

दोन वर्षांत या शेअरने पैसे दुप्पट केले
अवघ्या दोन वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी रामा स्टील ट्यूब कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 16.76 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. 31 ऑगस्ट 2024 रोजी रामा स्टील ट्यूब कंपनीने रामा डिफेन्स प्रायव्हेट लिमिटेड ही पूर्ण मालकीची उपकंपनी स्थापन केली होती. या नवीन युनिटला 2 सप्टेंबर 2024 रोजी कॉर्पोरेट केंद्रीय व्यवहार मंत्रालयाकडून निगमन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.

कंपनी संरक्षण क्षेत्रात व्यवसाय विस्तार करणार
रामा डिफेन्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी संरक्षण क्षेत्रात व्यवसाय विस्तार करणार आहे. या कंपनीने डिफेन्स व्यापार, आयात, निर्यात, उत्पादन, असेंब्ली आणि शस्त्रास्त्रे, दारूगोळा, स्फोटके आणि इतर लष्करी आणि सुरक्षा उपकरणे यांसारख्या संरक्षण उपकरणांचा पुरवठा व्यवसाय सुरू केला आहे. नुकताच अमेरिकेच्या मिनर्व्हा व्हेंचर्स फंडने रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड कंपनीचे 1.50 कोटी शेअर्स 10 रुपये प्रति शेअर किमतीवर खरेदी करून मोठी गुंतवणूक केली आहे. या अमेरिकन फर्मने रामा स्टील ट्यूब्स कंपनीमध्ये 15 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे.

Ebisu ग्लोबल अपॉर्च्युनिटीज फंडने 3 कोटी शेअर्स खरेदी केले
तसेच Ebisu ग्लोबल अपॉर्च्युनिटीज फंडने रामा स्टील ट्यूब्स कंपनीचे 3 कोटी शेअर्स 10 रुपये किमतीवर खरेदी केले आहेत. यासाठी त्यांनी रामा स्टील ट्यूब कंपनीमध्ये एकूण 30 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. नुकताच रामा स्टील ट्यूब्स कंपनीने आपल्या पात्र शेअरधारकांना मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 2 शेअरवर एक बोनस शेअर मोफत देणार आहे. यापूर्वी कंपनीने 2023 मध्ये बोनस शेअर वाटप केले होते. या कंपनीच्या प्रवर्तकांनी 56.33 टक्के भागभांडवल धारण केले आहे.

Latest Marathi News | Rama Steel Share Price 13 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Rama Steel Share Price(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x