
Ramkrishna Forgings Share Price | रामकृष्ण फोर्जिंग्स लिमिटेड या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना अल्पावधीत मल्टीबॅगर प्रॉफिट कमावून दिला आहे. मागील तीन वर्षात रामकृष्ण फोर्जिंग्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1770 टक्के नफा कमवून दिला आहे. 24 जुलै 2020 रोजी रामकृष्ण फोर्जिंग्स कंपनीचे शेअर्स 29.91 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 26 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 561 रुपये किमतीवर पोहचले होते. (Ramkrishna Share Price)
रामकृष्ण फोर्जिंग्ज कंपनीच्या शेअरने अवघ्या तीन वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 1 लाख रुपयेवर 18.70 लाख नफा मिळवून दिला आहे. 26 जुलै 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 175 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 27 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.64 टक्के घसरणीसह 557.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
जून 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या सात प्रवर्तकांनी 46.27 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर 66,234 सार्वजनिक गुंतवणूकदारांकडे 53.60 टक्के भाग भांडवल आहेत. रामकृष्ण फोर्जिंग्स कंपनीचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स 80.5 अंकावर आहे, यावरून कळते की, शेअर ओव्हरबॉट झोनमध्ये पोहचला आहे. रामकृष्ण फोर्जिंग्स कंपनीच्या स्टॉकचा एक वर्षाचा बीटा 1 आहे. यावरून कळते की, शेअरमध्ये अस्थिरता वाढली आहे.
रामकृष्ण फोर्जिंग्स कंपनीचे शेअर्स 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरी किमतीच्या वर ट्रेड करत आहेत. रामकृष्ण फोर्जिंग्स जून 2023 च्या तिमाहीत 63 टक्के वाढीसह 76.97 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
2022-23 या आर्थिक वर्षातील एप्रिल ते जून या तिमाही कालावधीत रामकृष्ण फोर्जिंग्स कंपनीने 47.26 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. जून तिमाहीत कंपनीने मागील वर्षीच्या तुलनेत 28 टक्के वाढीसह 835.95 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 650.75 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
24 जुलै 2023 रोजी रामकृष्ण फोर्जिंग्स कंपनीने मल्टीटेक ऑटो प्रायव्हेट लिमिटेड आणि तिच्या पूर्ण मालकीची उपकंपनी Mal Metaliks Pvt Ltd कंपनी 205 कोटी रुपये गुंतवणूक करून खरेदी केली आहे. मल्टिटेक ऑटो आणि माल मेटॅलिक ही कंपनी ऑटोमोबाईल आणि वाहन निर्मिती क्षेत्रासाठी असेंब्ली टॉप कव्हर, शिफ्ट सिलेंडर, असेंबली गियर, डिफरेंशियल केस, डिफरेंशियल कव्हर, असे विविध प्रकारचे उत्पादन बनवण्याचे काम करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.