
Ration Card | रेशनकार्डधारकांसाठी मोठी बातमी आहे. रेशनकार्डधारकांसाठी केंद्र सरकारकडून नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. तुम्हीही रेशन घेतलंत तर नवीन नियम नक्की जाणून घ्या नाहीतर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं.
नव्या सूचना जारी
सरकारकडून मोफत रेशन सुविधा उपलब्ध करून दिली जाते, त्याचा गैरफायदा अनेक अपात्र लोक घेत आहेत. हे टाळण्यासाठी सरकारकडून नवे नियम करण्यात आले आहेत. तसेच नव्या सूचनांचे पालन न करणाऱ्या लाभार्थ्यांचे रेशनकार्ड रद्द करण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे.
पडताळणी करावी लागेल
केंद्र सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार मोफत रेशन सुविधेचा लाभ घेणाऱ्या अशा सर्व लोकांनी आपली पडताळणी करून घ्यावी. त्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. पडताळणीत तुम्ही अपात्र ठरल्यास तुमचे कार्ड रद्द केले जाईल.
करोडो कार्ड रद्द करण्यात आली
अपात्र रेशनकार्डधारकांचे कार्ड सरकार वेगाने रद्द करत आहे. यावर वेगाने काम केले जात आहे. आतापर्यंत सुमारे 2 कोटी 41 लाख कार्ड रद्द करण्यात आले आहेत. यूपीमध्ये यापैकी बहुतेक कार्ड रद्द करण्यात आले आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.