 
						Ration Card Rules | जर तुमच्या कुटुंबाकडे आधीच रेशन कार्ड असेल आणि तुमचं नुकतंच लग्न झालं असेल, तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. ही बातमी रेशन कार्डच्या अपडेशनशी संबंधित आहे. रेशनकार्डमध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे असणे आवश्यक आहे. पण जर तुम्ही स्वत:हून किंवा तुमच्या कुटुंबात नवीन लग्न केलं असेल आणि कुटुंबात नवा सदस्य आला असेल, तर तुम्ही त्या सदस्याचं नावही रेशन कार्डमध्ये जोडलं पाहिजे. असं केलं नाही तर भविष्यात नुकसानीला सामोरं जावं लागेल. जाणून घेऊयात रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव जोडण्याची प्रक्रिया.
नव्या सदस्याचे नाव कसे जोडायचे
नुकतंच लग्न झालं असेल तर सर्वात आधी आधार कार्डमध्ये नाव अपडेट करावं. त्यासाठी महिला सदस्याच्या आधार कार्डमध्ये वडिलांऐवजी पतीचे नाव लिहावे लागणार आहे. कुटुंबात मूल जन्माला आलं असेल तर त्याचं नाव जोडायला वडिलांचं नाव आवश्यक असतं. आधार अपडेट झाल्यानंतर सुधारित आधार कार्डच्या फोटो स्टेटसह रेशन कार्डमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी अन्न विभागाच्या अधिकाऱ्याकडे अर्ज करावा.
ऑनलाइनही करू शकता अर्ज
वरील आधार कार्डाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अन्न विभाग अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करा. घरी बसल्या नवीन सदस्याचे नाव जोडण्यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. त्यासाठी आधी राज्याच्या अन्न पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जा. तुमच्या राज्यात रेशन कार्डवर ऑनलाईन सदस्यांचं नाव जोडण्याची सोय असेल तर घरबसल्या हे काम तुम्ही करू शकता. अनेक राज्यांमध्ये पोर्टलच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध आहे, तर अनेक राज्यांमध्ये ही सुविधा सुरू झालेली नाही.
मुलांचे नाव जोडायचे असल्यास
जर तुमच्या कुटुंबात मूल जन्माला आलं असेल आणि तुम्हाला त्याचं नाव रेशन कार्डमध्ये जोडायचं असेल तर तुम्हाला आधी त्याचं आधार कार्ड बनवावं लागेल. यासाठी तुम्हाला मुलाच्या जन्माचा दाखला आवश्यक असेल. यानंतर आधार कार्डद्वारे तुम्ही रेशन कार्डमध्ये मुलाचं नाव टाकण्यासाठी अर्ज करू शकता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		