
Rattan Power Share Price | रतन इंडिया पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 16.82 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे. मागील एका वर्षभरात या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 230 टक्के परतावा कमावून दिला आहे. याकाळात हा स्टॉक 5 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचला आहे. ( रतन इंडिया पॉवर कंपनी अंश )
मागील पाच दिवसात रतन इंडिया पॉवर कंपनीच्या शेअर्सची किंमत 8 टक्के वाढली आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 64 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 26 जुलै 2024 रोजी रतन इंडिया पॉवर स्टॉक 2.56 टक्के वाढीसह 17.24 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 82 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1000 टक्के परतावा कमावून दिला आहे. पाच वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरची किंमत 1 रुपये होती. रतन इंडिया पॉवर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 21.13 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 4.67 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 9,032.52 कोटी रुपये आहे.
मार्च तिमाहीत रतन इंडिया पॉवर कंपनी आपल्या वाढलेल्या उत्पन्नातून मोठा नफा मिळवण्यात यशस्वी ठरली आहे. मार्च 2023 तिमाहीत रतन इंडिया पॉवर कंपनीला 483.19 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. तर मार्च 2023 तिमाहीत या कंपनीचे एकूण उत्पन्न वाढून 995.73 कोटी रुपये नोंदवले गेले होते.
या वर्षी मार्च 2024 तिमाहीत कंपनीचे महसूल उत्पन्न 988.64 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. संपूर्ण आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये रतन इंडिया पॉवर कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 8896.75 रुपये नोंदवला गेला होता. तर मागील आर्थिक वर्षात या कंपनीला 1,869.85 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. संपूर्ण आर्थिक वर्षात रतन इंडिया पॉवर कंपनीचे एकूण उत्पन्न वाढून 3,704.78 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. मागील वर्षी कंपनीचे उत्पन्न 3,559.36 कोटी रुपये होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.